Thursday, 24 November 2022

26 नोव्हेंबर 2008... काळरात्र ठरलेला दिवस;थरारक,वेदनादायी आठवणी कायम26/11Mumbai Attack :26 नोव्हेंबर 2008...काळरात्र ठरलेला दिवस;थरारक, वेदनादायी आठवणी कायममुंबईला हादरवणारा 26/11 चा दिवस... आजही त्या जखमा प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम.26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबर 2008... काळरात्र ठरलेला दिवस; थरारक, वेदनादायी आठवणी कायम नोव्हेंबर 2008... मुंबईला हादरवणारा दिवस.आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येतो.आज या हल्ल्याला चौदा वर्ष पूर्ण झाली आहे.तरिदेखील या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात ताज्याच आहेत. दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. 26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत.स्वातंत्र्यानंतर देश अनेक दहशतवादी हल्ल्यांचा साक्षीदार बनला आहे.याच हल्ल्यांमध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचाही समावेश आहे.26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता.समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं.आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत.या घटनेला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत.आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते,तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाले.या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नारिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं.2008 मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईची शान म्हणून ओळख असेलल्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता,ज्यात 160 हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते.⭕मुंबईत दहशतपाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी हॉटेल ताज,नरिमन हाऊस,होटल ओबेरॉय आपल्या ताब्यात घेतलं होतं. याशिवाय अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्येही हल्ला केला. त्यांच्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे झाले. तर हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचा जीव घेतला.अतिरेक्यांनी एक टॅक्सी बॉम्बने उडवली होती. पोलिसांना मदत म्हणून रॅपिड अॅक्शन फोर्स (आरपीएफ),मरिन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडो यांना पाचारण करण्यात आलं.परंतु अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना तीन दिवस लागले.जवळपास 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती.⭕अनेक पोलीस शहीद,एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात यशया हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले.दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं.हा दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं.परंतु तुकाराम ओंबळे शहीद झाले. त्यांच्यामुळेच अजमल कसाबला जिवंत पकडता आलं आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यास मदत झाली.⭕कसाबला फाशी---मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला तातडीने फासावर लटकवण्याची मागणी केली जात होती.त्याने गुन्ह्याची कबुली देत हल्ल्यातील भूमिका स्वीकारली होती. कसाबला मुंबईतील आर्थर रोड जेलमधील अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं. खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली.कसाबला मे 2010 मध्ये विशेष कोर्टाने दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.त्यानंतर हायकोर्ट,सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. तिथेही फाशीची शिक्षा कायम राहिल्यानंतर कसाबने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला.राष्ट्रपतींनीहीत्याचा अर्ज फेटाळला.परंतु कसाबला फाशी देण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये रोष होता.2012 मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारला कसाबच्या फाशीाबाबतची फाईल मिळाली आणि राज्य सरकारने 21 नोव्हेंबरला फाशी देण्याचं निश्चित केलं. अखेर 21 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं.⭕ओंबाळे यांच्यामुळे कसाब जिवंत मिळाला-दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला सुरु करताच ओंबाळे यांना वॉकी-टॉकीवरून संदेश आला. दहशतवादी चौपाटीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करीत सुटल्याचा हा संदेश होता. हल्ला झाल्यावेळी ओंबाळे चौपाटीवर ड्यूटीवर होते.ओंबाळे व आणखी एक सहकारी चौपाटीवर पोहचले.तेवढ्याच कसाब व त्याच्या साथीदारांची गोळीबार करीत गाडी येत होती. जेव्हा कसाब व त्याचे साथीदार इतर ठिकाणी हल्ला करून चौपाटीवर पोहचले तेव्हा ओंबाळे यांनी कसाबला आडवले व पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र,कसाबच्या साथीदाराने ओंबाळेवर गोळ्या झाडल्या.मात्र त्यावेळी कसाबला टाकून त्याचे साथीदार गाडीत पळून गेले. या हल्ल्यात दहशतवाद्यांना कडवा लढा देऊन त्यांचा प्रतिकार माघारी परतवण्यात मोठी भूमिका बजावली ती पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे यांनी.ओंबाळे यांनी चौपाटीवरच प्राण सोडला मात्र त्यांच्यामुळेच कसाबला जिवंत पकडण्यात यश आले.⭕ओंबाळेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानविरोधात भक्कम पुरावे मिळाले-कसाब जखमी अवस्थेत तेथेच पडून राहिला.त्यामुळे पोलिसांना कसाबला जिवंत पकडण्यात यश मिळाले. पुढे कसाबमुळेच हा खटला आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला व भारताने पाकिस्तानचे पितळ उघड पाडले. याचबरोबर हल्ल्याला चार वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कसाबला पुण्यातील येरवडा जेलमध्ये सरकारने फासावर लटकवले. त्यामुळे ओंबाळेंनी आपल्या प्राणाची आहुती दिली तरी त्यांच्या धाडसामुळे कसाब हाती लागला.ओंबाळेंच्या या कर्तृत्वामुळे 26 जानेवारी 2009 रोजी यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.⭕त्या’ भयानक रात्री गोलीनं जन्म घेतला; कामा हॉस्पिटलमध्ये काय घडलं? आईनं सांगितलं----डॉक्टर मला सोडून तिथून गेले.गोंधळ झाला. सर्वजण इकडून तिकडे पळू लागले.१५-२० लोकं वार्डात शिरले. सर्व घाबरलेले होते.गोलीची आई विजू सांगतात की,त्यादिवशी संध्याकाळचे ७ वाजले होते.मला प्रचंड वेदना होऊ लागल्या. मी माझे पती शामू लक्ष्मणराव यांच्यासोबत कामा हॉस्पिटलला निघाली. हॉस्पिटलला पोहचताच डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल केले. पतीला औषधं आणण्यासाठी पाठवलं. ९.३० वाजता मला दुसऱ्या वॉर्डला शिफ्ट केले. बाहेर काय चाललंय त्याची काहीच कल्पना मला नव्हती. थोड्या वेळाने अचानक गोळीबारीचा आवाज कानी ऐकू आला.तेव्हा मी खूप घाबरले.डॉक्टर मला सोडून तिथून गेले.गोंधळ झाला. सर्वजण इकडून तिकडे पळू लागले. १५-२० लोकं वार्डात शिरले.सर्व घाबरलेले होते.कुणी खिडक्या बंद करत होतं तर कुणी पर्दा लावत होतं. तेव्हा कुणी विजूला लेबरवार्डला घेऊन जा असं म्हंटल.मला घाम फुटला होता. मी खूप भयभीत झाली होती.बाहेर गोळीबारीचा आवाज येत होता. भीतीपोटी मी ओरडूही शकत नव्हते. वेदनेने मी व्याकुळ झाले होते. याचवेळी माझ्या मुलीने या जगात जन्म घेतला.नर्सनं मुलीचं वजन केले आणि तिला झोपवलं.१०-१५ मिनिटांनी नर्स आली आणि मला जमिनीवर गादी टाकून झोपवलं. गोळीबार सुरु होता त्यामुळे खोलीची लाईट बंद केली होती. माझ्यासोबत ५ वर्षाचा मुलगाही होता.खोलीत अनेक महिला होत्या.CST स्टेशनवरुन काहीजण पळून आले होते असं विजूने सांगितले तर डॉक्टरांनी मला औषधं आणण्यासाठी पाठवलं होतं.मी लिफ्टमध्ये पोहचलो तेव्हा गोळीबारीचा आवाज ऐकला. मला वाटलं भारताच्या विजयामुळे फटाके फोडले जात असतील.मी औषधं आणायला जात असल्याचं सुरक्षा रक्षकाला सांगितले.त्यानंतर मी सीडीवरुन खाली उतरत होतो.तेव्हा रस्त्यावर येताच मला समोर भयानक दृश्य पाहायला मिळालं. लिफ्टमॅनलाही गोळी लागली होती. त्याच्या पोटातून रक्त वाहत होतं. मी घाबरलेल्या अवस्थेत होतो.मी ओरडत पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो आणि लोकांना एका वार्डात जाण्यास सांगितले.वार्डाचे दरवाजे बंद केले असं गोलीच्या वडिलांनी सांगितले.दरम्यान डिलीव्हरीनंतर CST स्टेशनवरुन आलेली महिला गोळीबारीचा घटना मला सांगत होती. तेव्हा मी घाबरले. तेव्हाच नवजात चिमुकलीला जाग आली मी तिला दूध पाजलं.नर्स आणि डॉक्टरने मला विचारलं काही खाल्लं का? तेव्हा मी काही खाल्लं नव्हतं म्हणून त्यांनी फळं आणून दिली.हा सगळा प्रकार गोळीबारीच्या घटनेत सुरु होता. तेव्हापासून मी माझ्या मुलीचं नाव गोली ठेवलं.काही लोकं तर एके ४७ ही बोलतात असं तिच्या आईनं सांगितले. ⭕या हल्ल्याच्या तीन दिवसापूर्वी २३ नोव्हेंबरला कराचीहून समुद्र मार्गे एका बोटीतून हे दहशतवादी मुंबईत पोहेचले होते.ज्या बोटीतून दहशतवादी आले होते ती भारतीय बोट होती आणि दहशतवाद्यांनी त्या बोटीवरील चार भारतीय प्रवाशांना मारून बोटीवर कब्जा केला होता. सुमारे ८ वाजता हे दहशतवादी कुलाबाजवळील कफ परेडच्या मासे बाजारात उतरले. येथून हे दहशतवादी चार गटात विभागले. त्यानंतर टॅक्सी पकडून आपाआपल्या ठिकाणी गेले.असे म्हटले जाते की, जेव्हा दहशतवादी मासे बाजारात उतरले होते तेव्हा त्यांना पाहून मच्छिमारांना संशय आला होता. याबाबतची माहिती मच्छिमारांनी स्थानिक पोलिसांना दिली होती.परंतु पोलिसांनी याकडे जास्त लक्ष दिले नाही.त्यानंतर रात्री ९.३० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.सीएसएमटी स्थानकांवरील मुख्य हॉलमध्ये दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.या दहशतवाद्यांमध्ये एक मोहम्मद अजमल कसाब होता दोन्ही दहशतवाद्यांनी एके-४७ रायफलमधून १५ मिनिट गोळीबार केला. ज्यामध्ये ५२ लोकं मृत्यूमुखी पडले होते आणि १०० हून अधिक लोकं जखमी झाले होते.⭕दहशतावाद्यांचा हा गोळीबार फक्त सीएसएमटी पुरता मर्यादित नव्हता. दक्षिण मुंबईच्या लिओपोल्ट कॅफेमध्ये देखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. मुंबईतील लोकप्रिय कॅफेपैकी एक लिओपोल्ट कॅफे आहे. या कॅफेमध्ये गोळीबार करून १० लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारले होते. यामध्ये काहीजण परदेशी होती. १८७१ पासून सुरू असलेल्या या कॅफेच्या भिंतींवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराचे निशाण अजूनही आहेत.भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्यांपैकी या हल्ल्याची कहाणी अत्यंत थरारक आणि वेदनादायक आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांना निशाणा ताज हॉटेल,⭕ओबेरॉय ट्रायडेंट आणि नरीमन हाऊसवर देखील होता. जेव्हा ताज हॉटेलवर हल्ला झाला त्यावेळेस ४५० आणि ओबेरॉयमध्ये ३८० लोकं उपस्थितीत होते. या सर्व लोकांसाठी ती एक भयानक रात्र होती.हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच २७ नोव्हेंबरला ताज हॉटेलमधील सर्व लोकांची सुटका झाल्याचे समोर आले. परंतु अजूनही काही लोकं दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत,ज्यामध्ये काही परदेशी नागरिक आहेत,अशी बातमी आली होती. दहशतवादी हल्ल्यादरम्यान दोन्ही हॉटेलला रॅपिड अॅक्शन फोर्स (आरपीएफ), मरीन कमांडर आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) या कमांडरांनी घरले होते.परंतु माध्यमांच्या लाईव्ह कव्हरेजमुळे सुरक्षा दलाच्या सर्व हालचालींची माहिती टीव्हीवरून दहशतवाद्यांना मिळत होती.सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन दिवस ही चकमक सुरू राहिली होती. यादरम्यान मुंबईत हल्ले झाले, आग लागली, गोळीबार झाला होता. मुंबई आणि भारतातीलच नव्हे तर जगभरातील १.२५ अब्ज लोकांच्या नजरा ताज,ओबेरॉय आणि नरिमन हाऊसवर खिळल्या होत्या. ज्या दिवशी ताज हॉटेलवर हल्ला झाला, त्या दिवशी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या संसदीय समितीचे अनेक सदस्य हॉटेलमध्ये थांबले होते,तरीही त्यांच्यापैकी कोणालाही इजा झाली नाही.२९ नोव्हेंबरच्या सकाळीपर्यंत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते आणि कसाब पोलिसांच्या ताब्यात होता. मुंबईतील परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आली होती,पण या दहशतवादी हल्ल्यामध्ये १६६ जणांनी आपले प्राण गमावले.⭕हल्ल्यात गेला होता या IPSचा बळी,ओळखले जायचे MR. बॉडी बिल्डर----मुंबईवरील हल्ल्याला आज चौदा वर्षे पूर्ण होत आहेत.देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्लाने मुंबई पुरती हादरून गेली होती.मुंबईवरील हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी अशोक कामटे या IPS अधिका-याचा मृत्यू झाला होता. 'महाराष्ट्र पोलिस दलाचे हिरो'अशोक कामटे यांची जिगरबाज IPS अधिकारी अशी ओळख राहिली असली तरी त्यांची पोलिस दलात मात्र ओळख होती एक 'MR. बॉडीबिल्डर' म्हणून.महाराष्ट्र पोलिस दल देशातील सर्वात ताकदीचे दल म्हणून परिचित आहे. त्याचमुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी गुन्हेगारी आहे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र पोलिस चोखपणे आपली जबाबदारी पार पाडतात.गुन्हेगारी प्रकरणांचा तपास लावण्यात महाराष्ट्र पोलिसांचा हातखंडा मानला जातो. याचबरोबर इतर क्षेत्रातही महाराष्ट्र पोलिसांनी आपले नाव रोशन केले आहे.⭕पुण्याजवळील सासवड आहे कामटेंचे गाव-अशोक कामटे मूळचे पुण्याजवळील सासवडचे. मात्र त्यांच्या कटुंबियांचे वास्तव्य पुण्यातील पिंपळे निलख परिसरात आहे.1989च्या IPS बॅचचे अधिकारी राहिलेले कामटे एक सर्वात यशस्वी गणले गेले आहेत.भारतीय पोलिस सेवेतील (आईपीएस) अधिका-यांपैकी सर्वात वेगळी छाप त्यांनी सोडली होती.त्यांनी अपहरण केलेल्या व दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या नागरिकांना सोडविण्यासाठी खडतर प्रशिक्षण घेतले होते.त्याचमुळे मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कामटे त्यांच्यावर तुटून पडले होते. 26/11 हल्ल्यादरम्यान अशोक कामटे यांच्याकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दहशतवाद्यांशी मुंबईतील कामा हॉस्पिटलजवळ कामटे शहीद झाले होते.कामटे यांच्या पराक्रमाला अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.⭕बॉडी बिल्डिंगमध्ये जिंकले होते अनेक किताब-अशोक कामटे हे एका आयपीएस अधिका-याचा मुलगा होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना घरात व्यायामाचे बाळकडू मिळाले होते. त्यामुळे लहानपणापासून पिळदार शरीर बनविल्याने अशोक कामटेंनी महाविद्यालयीन काळात बॉडी बिल्डिंगचा छंद लागला. तो तालमीच्या आखाड्यासोबत जिममध्ये जाऊ लागले.मेहनती व व्यायमाचा छंद जडल्याने त्या काळात अशोक कामटे यांनी अनेक ठिकाणी बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकल्या होत्या.त्याचदरम्यान अपार अभ्यास व शारीरिक कष्ट घेत IPS पोस्ट घेतली.आयपीएस अधिकारी झाल्यानंतरही त्यांनी पोलिस दलातून बॉडी बिल्डिंग स्पर्धेत यश मिळवले. पुढे यूएनचे मेडल जिंकले.त्याचमुळे अशोक कामटेंची पोलिस दलात MR. बॉडी बिल्डर म्हणून ओळखले जाऊ लागले.⭕पत्नी विनिताने लिहले पुस्तक-मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटेंच्या पत्नी विनिता यांनी आपल्या बहाद्दुर पतीवर पुस्तक लिहले. या पुस्तकाचे नाव 'टू द लास्ट बुलेट' असे आहे. या पुस्तकात विनितानी अशोक कामटे यांचा जीवनपटच त्यात लिहला आहे. 26/11 मुंबई हल्ल्याच्या रात्री अशोक कामटेंनी आपली पत्नी विनिता व मुलांशी केलेली बातचित याची माहिती दिली आहे. त्यानंतर तासाभरात कामटे शहीद झाले होते. विनितानी लिहलेले पुस्तक वाचताना अंगावर काटे उभे राहतात.⭕हल्ल्याची ठिकाण-ठिकाण हल्ल्याचा प्रकार१)छत्रपती शिवाजी टर्मिनस २)लियोपोल्ड कॅफे,३)कुलाबा४)ताज महाल हॉटेल५)ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल६)मादाम कामा इस्पितळ७)नरीमन हाउस गोळीबार,८)मेट्रो सिनेमा गोळीबार९)माझगांव डॉक१०)विले पार्ले⭕मृत्यू पावलेल्या प्रमुख व्यक्ती----------प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह 17 पोलीस वीरमरण पावले आहेत.1)तुकाराम ओंबळे - सहाय्यक उपनिरिक्षक,मुंबई पोलिस.यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वतःचे प्राण गमावले.2)हेमंत करकरे - मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी3)अशोक कामटे - ऍडिशनल पोलीस कमिशनर4)विजय साळसकर - एनकाउंटर स्पेशालिस्ट5)शशांक शिंदे - वरिष्ठ पोलीस निरिक्षक6)मेजर संदीप उन्नीकृष्णन - एन.एस.जी. कमांडो अधिकारी7)हवालदार चंदर - एन.एस.जी. कमांडो8)हवालदार गजेंदर सिंह बिष्ट - एन.एस.जी. कमांडो9)अरूण चित्ते10)राहुल शिंदे11)प्रकाश मोरे12)बापूसाहेब दुरगाडे13)योगेश पाटील14)यशवंत पाटील15)विजय खांडेकर16)अंबादास पवार17)बाबासाहेब भोसले18)M s चौधरी19)मुकेश जाधव अँड्रियास लिव्हरास हा ब्रिटिश उद्योगपती हल्ल्यांत मृत्यू पावला. जर्मन दूरचित्रवाणी निर्माता राल्फ बर्केई, फ्रेंच उद्योगपती लूमिया हिरिद्जी आणि तिचा नवरा हेही मृतांत आहेत.नरीमन हाउसमध्ये गॅव्रियेल नोआह होल्त्झबर्ग, त्यांची पत्नी रिव्का होल्त्झबर्ग हे मृत्युमुखी पडले.महाराष्ट्र सरकार ने प्रत्येक मृताच्या नातेवाईकास ५ लाख रुपये तर जखमींना ५०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.⭕संदर्भ व नोंदी-------------- "मुंबई ट्रॉमा एंड्स, लीव्ज बिहाइंड ॲन आउटरेज्ड नेशन" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2008-12-02. 2008-11-30 रोजी पाहिले. "मुंबई फायटिंग नॅरोझ टू वन होटेल" (इंग्लिश भाषेत). "पोलिस डिक्लेर मुंबई सीज ओव्हर" (इंग्लिश भाषेत). "अ डे ऑफ रेकनिंग ॲझ इंडिया टोल टॉप्स १७०" (इंग्लिश भाषेत). "स्कोर्स किल्ड इन मुंबई रॅम्पेज" (इंग्लिश भाषेत). २००८-११-२६ रोजी पाहिले. "कॉप्स क्लूलेस अबाउट व्हिले पार्ले टॅक्सी ब्लास्ट" (इंग्लिश भाषेत). २००८-११-२८ रोजी पाहिले. श्मिट, एरिक. "यू.एस. अँड इंडिया सी लिंक टू मिलिटंट्स इन पाकिस्तान" (इंग्लिश भाषेत). २००८-१२-०३ रोजी पाहिले. "पाकिस्तान कंटिन्यूज टू रेझिस्ट इंडिया प्रेशर ऑन मुंबई" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2009-01-14. २००९-०१-०८ रोजी पाहिले. "सरव्हायविंग गनमॅन्स आयडेंटिटी एस्टाब्लिश्ड ॲझ पाकिस्तानी" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2019-03-31. २००९-०१-०७ रोजी पाहिले. "Mumbai targets were favourite hangouts for affluent" (इंग्लिश भाषेत). 26, November, 2008. Archived from the original on 2012-10-23.

No comments:

Post a Comment