Tuesday, 29 November 2022

दोन वर्षानंतर यंदा संच मान्यतेच्या हालचाली-मागील दोन वर्षापासून रखडलेल्या संच मान्यतेच्या हालचालीला वेग आला आहे.मात्र चालू शैक्षणिक वर्षाची संचमान्यता दिनांक 30 सप्टेंबर नव्हे तर 30 नोव्हेंबरच्या पटसंख्यानुसार करण्याचा फतवा प्राथमिक शिक्षण संचालयाने काढले आहे शैक्षणिक सत्र 2014-15 पासून मागील दोन वर्षापर्यंत शाळांच्या संच मान्यता सरल प्रणाली द्वारे करण्यात आल्या.यंदा शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेसाठी दिनांक 30 नोव्हेंबर ची पटसंख्या विचारात घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.त्यासाठी मुख्याध्यापकांना सरलप्रणालीमध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या अध्यायावत करावी लागणार आहे.दि 30 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थी संख्या अद्यावत न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकण्यात आली आहे.यंदा पहिल्यांदाच संच मान्यता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या आधारे केली जाणार आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून ते स्टुडन्ट पोर्टलवर अद्ययावत करणे गरजेचे आहे आता 30 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे वेगवेगळ्या ठिकाणी जर एकाच विद्यार्थ्यांचे पटावर नाव असेल तर ते आधार कार्ड मुळे समजणार असून शाळांकडून दाखविल्या जाणाऱ्या बोगस विद्यार्थी संख्येला चाप बसणार आहे कोरोनामुळे शहरांमधील अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली यामुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधील सरकारी शाळांची पटसंख्या घटली आहे.विस्कटलेली पटसंख्या निश्चित करण्यासाठी यंदा केली जाणारी संच मान्यता महत्त्वाची ठरणार आहे

No comments:

Post a Comment