प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सहल काढायची असल्यास शिक्षण विभागाने त्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.परंतु शाळांना सहलीचे नियोजन करण्यापूर्वी लेखी परवानगी घ्याव्या लागणार आहे
तसेच सहलीला निघण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र घेणे बंधनकारक तथापि याकरता जहरीसाठी 26 अटी लावण्यात आल्या असून त्याबाबत मुख्याध्यापकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने
सूचना जाहीर केल्या आहेत
1- सहलीला जाण्यापूर्वी किमान पंधरा दिवस आधी सहल परवानगी प्रस्ताव सादर करावा
2- सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी सहल काढताना संबंधित गटशिक्षणाधिकारी,शिक्षणअधिकारी,शिक्षण प्रमुख,शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक
3- सहलीच्या सर्व बाबी लेखी स्वरूपात देण्यात याव्यात
4- शाळेच्या सहली गड किल्ल्यांच्या ठिकाणी नेण्यात याव्यात
5- वॉटर पार्क-एडवेंचर पार्क अशा ठिकाणी सहली काढण्यास पुरेशी काळजी घ्यावी
6- विद्यार्थ्यांचे विमा काढण्यात यावा
7- समुद्रकिनारे,पर्वत नदी उंच टेकड्या येथे नेताना पुरेशी काळजी घ्यावी
8- सहलीला निघण्यापूर्वी पालकांचे संमती पत्रक राहील बंधन कारक
9- आपत्कालीन परिस्थिती उद्भवले असून बचाव करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे
10- सहल नियोजनाचा आराखडा पालकांना कळविण्यात यावा
11- परिवहन महामंडळाच्या एसटी बस ने सहल घेऊन जाव्यात
12- वीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा
13- सहलीची सक्ती करू नये
14- प्राथमिक विभाग वगळून राज्य बाहेरील सहली नेण्यास हरकत नाही
शिक्षण विभागाच्या अटी निर्माण मुळे खाजगी आणि महापालिकेच्या शाळा सहलींकडे पाठ फिरवत आहेत सरकारी नियमानबाबत निर्णयाबाबत शाळांनी सहलीसाठी परिवहन महामंडळाच्या एसटीलाच प्राधान्य द्यावे हा नियम आहे
मात्र खाजगी शाळांचा स्वतःच्या स्कूलबस सहलीसाठी वापरण्याचाही आग्रह आहे सहलीसाठी स्कूल बस ची परवानगी मिळणार नाही म्हणून काही खाजगी शाळांनी परवानगी शिवाय सहल काढले आहेत
अशा सहली ची जबाबदारी सर्वस्वी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे आहेया सर्व नियमांमुळे पालक आणि मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली आहे त्यामुळे यंदा शाळांचा सहली काढण्याबाबत प्रतिसाद कमी होण्याची शक्यता आहे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
No comments:
Post a Comment