---शाळा भरण्यापूर्वी किमान ३० ते ४० मिनिटे अगोदर बहुतेक विद्यार्थी शाळेत येतात.
मात्र जिल्हा परिषदेच्या २७४ शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे.
अशी स्थिती असतानाही अनेक शाळांमधील मुख्याध्यापक,शिक्षक शाळा भरायला १० ते १५ मिनिटे कमी असताना येतात हे विशेष...
पण त्यांना आता शाळेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळे अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती कार्यरत आहे शाळांमध्ये अध्यापन व्यवस्थित सुरू आहे का कोणी वैयक्तिक कामासाठी मोबाईल वापरले का?यावर त्यांच्या गरजेनुसार वॉच असावा वास्तविक पाहता दूर अंतरावरून येणाऱ्या शिक्षकांनी त्या गावातच राहणे अपेक्षित आहे
परंतु दळणवळणाची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने बहुतेक शिक्षक मुख्यालयात राहतच नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
पूर्वी मुख्यालयात राहणाऱ्या शिक्षकांची मुले देखील त्याच जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकत होती आता परिस्थिती बदलली आहे दुसरीकडे ज्या शाळा मधील गुणवत्ता दर्जेदार तेथील पटसंख्या मोठी असेही चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.
मुलांना भविष्यातील वाटचालीचा यशस्वी मार्ग दाखवण्याचा शिक्षकांचा खूप मोठा वाटा राहिला आहे.
त्यामुळे अध्यापनाला अध्यापनात पिछाडीवर असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे
त्या दृष्टीने वर्ग शिक्षकांनी काही वेळ अगोदर येऊन त्या मुलांना अध्यापन करणे आवश्यक आहे इंग्रजी व खाजगी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या टिकवणे हे शिक्षकांसमोरील मोठे आवाहन बनले आहे
त्यावर गुणवत्ता वाढ हाच एकमेव पर्याय आहे.
_________________________
गावातील मुले शाळा भरण्यापूर्वी अर्धा पाऊण तास अगोदर येतात ही वस्तुस्थिती आहे.
आपल्या वर्गातील प्रत्येक मुलगा हुशार असायलाच हवा या भावनेतून प्रत्येक शाळेतील शिक्षकांचे अध्यापन सुरू आहे.
मुले लवकर येत असतील तर शिक्षक जादा तास देखील घेऊ शकतात
पण शाळा भरण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे अगोदर शिक्षकांनी शाळेत हजर राहणे बंधनकारक आहे
प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर
No comments:
Post a Comment