▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या निकाल (SSC Result 2025) लागणार आहे.
उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन दहावीचा निकाल पाहता येणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीच्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे.
एकीकडे सगळ्या बोर्डाचे निकाल जाहीर आहेत.
या दरम्यान आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची अपडेट समोर आली आहे.
उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे.
यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
आता उद्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
१३ मे रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
आता या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे.
निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून,त्यात निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕विद्यार्थ्यांना कुठे पाहता येणार निकाल?
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे
⭕दहावीच्या निकालाची गुणपत्रिका ऑनलाइन कशी डाउनलोड करावी?
१: mahresult.nic.in ला भेट द्या
२: ‘Maharashtra SSC Result 2024’ असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
३: तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका
४: तुमचा निकाल पाहण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेशांसाठी https://mahafyjcadmissions.in हे अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.
नवे संकेतस्थळ ९ मेपासून कार्यान्वित करण्यात आले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕अकरावीत सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स फिल्डमध्ये प्रवेशासाठी खालील कागदपत्रे महत्वाची:-
१) जन्म दाखला (Birth Certificate)
२) दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
3) रेशन कार्ड
४) ओळखपत्र फोटोसह
५) आधार कार्ड
६) घराचं इलेक्ट्रिक बिल
७) १० वीची मार्कशिट
८) जातीचे प्रमाणपत्र
९) दहावीच्या परीक्षेची हॉल तिकीट (11th Admission)
10) नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (Non-Creamy Layer certificate/ Income Certificate)▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
No comments:
Post a Comment