Thursday, 15 May 2025

धावत्या दुचाकीवर वीज कोसळली,नांदेडमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू;पोलिसांची घटनास्थळी धाव

नांदेडमध्ये धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी 3 वाजता वीजांच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस झाला.

नांदेड : राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून वळवाच्या पावसाने (Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यासोबतच, अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, काही ठिकाणी नागरिकांनाही आपला जीव गमावाला लागला आहे.
आता,नांदेड (Nanded) जिल्ह्यातील एका शिक्षकाचा (Teacher) वीज अंगावर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या दुचाकीवरच वीज कोसळल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
नांदेडमध्ये धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी 3 वाजता वीजांच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस झाला. मात्र, वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटाने परिसरात हादरुन गेला होता.
या दरम्यान आपल्या करंजी या गावाकडे शिक्षक संजय पांडे दुचाकीवरुन जात होते.
दुर्दैवाने त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली, त्यात संजय पांडे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने त्यांच्या अंगावर वीज पडल्याची चर्चा परिसरात होत आहे. मात्र, तसा दावा कुठल्याही संबंधित यंत्रणेने किंवा पोलिसांनी केला नाही. दरम्यान, पावसाळी वातावरणात मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासन करत असतं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही घटना घडल्याची देखील चर्चा गावपरिसरात होत आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔴वीज पडण्याची शक्यता वाढल्यास सावध राहण्यासाठी, घराबाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या,
उंच ठिकाणी आणि पाण्याच्या जवळ जाऊ नका.

🔴घरात असाल तर विद्युत उपकरणे बंद करा आणि त्यांच्यापासून दूर राहा.

🔴घराबाहेर सावध राहण्यासाठी:सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या:

🔴घरामध्ये किंवा मजबूत इमारतीमध्ये आश्रय घ्या.

🔴जर तुमच्याकडे सुरक्षित ठिकाण नसेल,तर शक्य तितके खालील जमिनीवर जा आणि उंच वस्तूंपासून दूर राहा.

🔴उंच ठिकाणी आणि पाण्याच्या जवळ जाऊ नका:
झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ,किंवा पाण्याच्या जवळ जाऊ नका.

🔴धातूच्या वस्तूंपासून दूर राहा:
धातूची कुंपणे,वायर आणि पाईप यांसारख्या वस्तूंपासून दूर राहा.

🔴सायकल, मोटर सायकल किंवा ट्रॅक्टरवर प्रवास करू नका:
अशा प्रकारच्या प्रवासावर वीज येण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे यावर प्रवास करणे टाळा.

🔴जमिनीवर आडवे व्हा किंवा गुडघ्यात बसून घ्या:
जर तुम्हाला विद्युत प्रभार जाणवला किंवा अंगावरील केस उभे झाले,तर लगेच जमिनीवर आडवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा. 

🔴घरात सावध राहण्यासाठी:
विद्युत उपकरणे बंद करा:
विजा चमकत असताना,विद्युत उपकरणे चालू करू नका. त्यांना प्लगमधून काढून टाका.

🔴खिडक्या आणि दारांपासून दूर राहा:
खिडक्या आणि दारांच्या जवळ उभे राहू नका, कारण वीज यातून येऊ शकते.

🔴पाणी किंवा धातुच्या वस्तूंना स्पर्श करू नका:
पाण्याचे नळ, फ्रिज, किंवा इतर धातूच्या वस्तूंना स्पर्श करू नका. 

🔴घराची वायरिंग तपासणी करा:
वीज पडल्यास, घराची वायरिंग तपासणी करा. जर काहीतरी बिघडले असेल, तर त्वरित इलेक्ट्रिशियनला बोलावून दुरुस्ती करा. 

🔴घराबाहेरच्या कामातून घरी परत येणे:
जर तुम्ही शेतात किंवा बाहेर काम करत असाल, तर वीज चमकू लागल्यास लगेच घरी परत जा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕सुरक्षित कसे व्हावे?
वाहते पाणी : हे विद्युत संवाहक आहे. वाहत्या पाण्यात किंवा ओल्या जागी थांबू नये. दूर पडलेल्या विजेची विद्युतधारा वाहत येवून या पाण्यात उभे राहणारी व्यक्ती दुर्घटनाग्रस्त होऊ शकते. पाण्यासाठी हातपंपाचा किंवा शेती-मळ्यात वीजपंपाचा वापर करू नये. पोहण्याचे तलाव, विह‌िरीतदेखील उतरू नये. मच्छिमारांनीही ताबडतोब बाहेर निघावे.

⭕उंच झाडे : पावसामुळे ओली झालेली झाडे ही असुरक्षित आसरा आहेत. म्हणून विजा चमकतांना झाडांखाली बिलकुल थांबू नये. झाडावर वीज कोसळली तरी झाडापासून विजेच्या शलाका निघून झाडाखाली थांबणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या संपर्कात येतात व विजेचा शॉक लागून व्यक्ती दगावू शकते.

⭕खेळाची मैदाने : खेळाची मैदाने शेती, मळे, टेकड्या किनारपट्टी आदी उघड्या ठिकाणी कधीही थांबू नये. विजांचा गडगडाट कानी पडण्याआधीचे येथून दूर जावे. पक्की इमारत, घर, ऑफिस अशा कोरड्या ठिकाणी आसरा घ्यावा. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नये. विजा कमीत-कमी रोधकाचा व लहानात-लहान मार्ग आपल्या प्रवासात निवडतात. मोकळ्या मैदानांमध्ये आपली उंची सर्वाधिक असल्याने वीज आपल्यावर कोसळण्याची शक्यता जास्त असते. काहीच पर्याय न आढळल्यास जवळपासच्या उंच गोष्टींपेक्षा आपली उंची कमी करावी. अंगावर वीज कोसळण्याची शक्यता कमी करण्यासाठी खाली बसणे अथवा जमिनीवर सरळ लोटांगण घालणे हा उपायही अनेकदा उपयोगी ठरू शकतो.

⭕कानाची सुरक्षितता : विजा पडतात तेव्हा त्या हवेला अक्षरश: जाळीत मार्गक्रमण करतात. परिणामी हवेची निर्वात पोकळी निर्माण होते. ही निर्वात पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा प्रचंड वेगाने एकाच पोकळीत शिरू पाहते आणि हवेचे थर एकमेंकावर आदळल्याने प्रचंड गडगडाट ऐकू येतो. यातून निर्माण होणाऱ्या ‘अॅकॉस्टिक शॉक वेव्हज’ या खिडकीची काचेची तावदाने ही तोडून टाकतात. या आवाजामध्ये कानाचा नाजूक पडदा फाडून टाकण्याएवढी ऊर्जाही असते. म्हणून कानात बोटे घालून कानाच्या पडद्याचे संरक्षण करणे हा उत्तम उपाय होय.
⭕असुरक्षित जागा-------
१.विजा पडत असतांना, असुरक्षित गोष्टींच्या यादीत पुढील गोष्टी येतात.

२.गोल्फ, फुटबॉल, क्रिकेटची मैदाने

३.उंच जागा, पहाड, टेकड्या, पाण्याच्या टाक्या, ओले शेत-मळे

४.उंच झाडे

५.धातूचे शेड,धातूचे बसस्टॉप

६.धातूच्या तारा, धातूच्या तारांचे कुंपण

७.खुले पिकनिक स्पॉट

.किनारपट्टी

९.ओल्या भिंती, वाहते पाणी

१०.मोबाइल टॉवर
११.पाण्याचे पाइप व नळ
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
काही गैरसमज-------
⭕ढगांची टक्कर : ‘दोन ढगांची टक्कर झाली की विजा चमकतात’ असे अनेकांनी ऐकले असेल. मात्र, वैज्ञानिक सत्य काही वेगळेच आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ढगांतून जेव्हा विद्युतभार वाहून जातो तेव्हा वीज चमकते.

⭕मोबाइलना विजांचे आकर्षण : ‘मोबाइल विजांना आकर्षित करतात’ हा गैरसमजच आहे. व्यावहारिक दृष्टीकोनातून बघितले तर मोबाइलच्या सिग्नल पॉवरपेक्षा, मोबाइल टॉवरवर मोबाइल रेंजसाठी कार्यरत असलेल्या असंख्य मोबाइल अँटिनांची, ‘सिग्नल पॉवर’ हजारोपट जास्त असते. अशा वेळी विजा या सेन्सर अँटिनावर कोसळणे किंवा त्यांची दिशा बदलताना दिसणे तरी आवश्यक आहे; मात्र असे होत नाही. यावरूनदेखील हे हे सत्य सिध्द होते की मोबाइल विजांना आकर्षित करीत नाही.
⭕पायाळू माणूस : ‘पायाकडून जन्म झालेल्या किंवा पायाळू माणसावर वीज कोसळण्याचा धोका जास्त असतो हादेखील एक गैरसमजच आहे विजा पडताना त्या कमीत कमी रोधक मार्गाची निवड करतात. एखाद्या व्यक्तीने डोक्याकडून जन्म घेतला की पायाकडून यावर व्यक्तीच्या शरीराची रोधकता अवलंबून नसते. त्यामुळे विजांचा धोका जेवढा डोक्याकडून जन्म घेणाऱ्या व्यक्तीला आहे, तेवढाच पायाकडून जन्म घेणाऱ्यालादेखील आहे. पायाळू माणसाच्या पायात किंवा हातात धातूचे कडे घातल्याने विजा अशा व्यक्तीकडे जास्त आकर्षित होतात.
RDM_SMS
सौजन्य ABP माझा

No comments:

Post a Comment