Tuesday, 20 May 2025

हत्येसाठी 'त्या' मुख्याध्यापिकेने बनविला विद्यार्थ्यांचा ग्रुप शंतनू देशमुख हत्या प्रकरण


हत्येसाठी 'त्या' मुख्याध्यापिकेने बनविला विद्यार्थ्यांचा ग्रुप
शंतनू देशमुख हत्या प्रकरण
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सनराईज इंग्लिश मिडियम स्कूलमधील शिक्षकाची त्याच्या मुख्याध्यापक असलेल्या पत्नीनेच विष देऊन हत्या केली आहे.
या प्रकरणात लोहारा पोलिसांनी आरोपी पत्नी मुख्याध्यापक निधी शंतनू देशमुख हिला ताब्यात घेतले आहे.
सनराईज इंग्लिश मिडियम स्कूल याच शाळेतील शिक्षक शंतनू अरविंद देशमुख (वय 32) असे मृतकाचे नाव आहे.
गुरुवार,15 मे रोजी लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौसाळा जंगल परिसरात एक अनोळखी पुरुषाचे अर्धवट जळालेले प्रेत आढळून आले.
चौसाळा जंगलात 15 मे रोजी जळालेल्या
अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला होता.
मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर त्या युवकाचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाल्याचे पुढे आले.
यावरून तपासाला गती मिळणे शक्य नव्हते.
पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू केला.
हाती काही लागले नाही.

नंतर परिसरातील चर्चेतून मृताची ओळख पटली.
खून करण्यासाठी मुख्याध्यापक पत्नीने यूपीएससी मिशन 2030 हा ग्रुप
बनवून विद्यार्थ्यांनाच वापरल्याचे पुढे आले.
एखाद्या थ्रीलर चित्रपटाचे कथानक
शोभेल असा घटनाक्रम शंतनू अरविंद देशमुख (32) रा. सुयोगनगर, दारव्हा रोड, यवतमाळ खून प्रकरणातून पुढे आला आहे.

वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या निधी शंतनू देशमुख (23) हिनेच पतीच्या खुनासाठी थंड डोक्याने व्यूहरचना आखली.
यासाठी ती ज्या सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होती,
तेथील विद्यार्थ्यांचा वापर केला.

मुलांना 2030 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण करायचे आहे,असे स्वप्न त्यांच्या पालकांना दाखविले.
शिक्षिका पुढाकार घेऊन मुलांसाठी
पहाटे 4 वाजता मैदानावर येते,याचे अप्रूप पालकांना वाटू लागले.
शिक्षिका निधी शंतनू देशमुख हिच्या प्रभावाखाली मुले आली. हत्याकांडाचा कट डोक्यात शिजवलेला असताना तिने पती शंतनूवर विषप्रयोग करून त्याला ठार केले.
नंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तीन विद्यार्थ्यांची मदत घेतली.

त्याकरिता मुलांना पहाटे 2 वाजता बोलाविले. तिघांनी दुचाकीवरून शंतनूचा मृतदेह साडी व ब्लॅकेटमध्ये गुंडाळून चौसाळा जंगलात पेटवून तेथेच नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
शंतनूच्या दारुड्या मित्रांवर संशय अन् सुगावा:-
पोलिसांना शंतनू बेपत्ता असल्याची चर्चा ऐकायला मिळाली.
त्यांनी त्याच्या दारुड्या मित्रांवरच लक्ष केंद्रित केले.
त्यात शंतनूच्या एका मित्राकडे त्याचा मंगळवार,13 मे रोजीचा फोटो मिळाला.
त्या फोटोतील शर्ट आणि चौसाळा जंगलात मृतदेहाजवळ आढळलेल्या कापडाचा तुकडा मिळताजुळता होता.
यामुळे पोलिसांनी शंतनू नेमका कुठे यावर काम करणे सुरू केले.
त्यातून पुढील घटनाक्रम उघड झाला.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
तीन विद्यार्थी ताब्यात:-
1.प्रारंभी निधीने पोलिसांना गुंगारा दिला.
मात्र,तिच्या घरात आढळलेली अंडरवेअर व मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीची असल्याने पोलिसांचा संशय बळावला.

2.तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करताच निधीने हत्येचा संपूर्ण घटनाक्रमच कबुलीतून सांगितला. मृतदेह जाळण्यास मदत केलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
गुगलवरून तयार केले विष:-
शंतनू दारूच्या आहारी गेला होता.
त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला.
तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले.
दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले.त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी व अल्पवयीन मुले यांच्यातील मोबाईल संभाषणाची तांत्रिक माहिती घेतली असता त्यात सबळ पुरावा मिळून आला.
मृतकाची पत्नी,आरोपी निधी शंतनू देशमुख हिला अटक करून पुढील तपास पोलिस ठाणे लोहारा यांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणातील तिन्ही विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार यशोधरा मुनेश्वर करीत आहेत.
स्थागुशा पथकाचे परिश्रम
हा गुन्हा उघड आण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे,सहायक निरीक्षक संतोष मनवर,योगेश गटलेवार,अजय डोळे,विनोद राठोड,निलेश राठोड,रितुराज मेढवे,आकाश सहारे यांनी परिश्रम घेतले.
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
लोकमत
तरुण भारत

No comments:

Post a Comment