नकली वस्तू सुद्धा इतके हुबेहूब आले आहेत की माणसं पक्षांसारखं धोका खातात
🪶🪽🦃🦤🦚🦜🦢🦩🕊️🪶🪽🐓🦃🦤
माणूस आणि चिमणी त्यांचं नातं खूप जुनाआहे;माणसांची सकाळची सुरुवात चिमण्यांच्या मधूर आवाजात सुरू होत होती.
पण आता अलीकडील काळात यांची संख्या सुद्धा खूप झपाट्याने कमी होत आहे.
हे आपल्याला सांगण्याची गरज नाही याला कारणीभूत दुसरं-तिसरं कोणी नसून आपण स्वतःहून स्पर्धा आणि तंत्रज्ञान यांच्या विकासात आपण इतके हरवून चाललो आहोत की यात आपण जिंकलो की हरलो हे आपल्यालाच माहीत नाही.
लहान नातवांना मुलांना कावळा-चिमणीची गोष्ट सांगायची झाली तर ते आपण त्यांना चित्रात दाखवून सांगतो चिऊ चिऊ ये,चारा खा,पाणी पी भूररर्ररर...उडून जा किती छान होती ना ही कविता आता ती फक्त कविताच राहिली वाढत चाललेले शहरीकरण,प्रदूषण,कीटकनाशकांचा बेसुमार वापर यांच्यामुळे यामध्ये झपाट्याने त्यांची संख्या कमी होत आहे.
बेसुमार वृक्षतोड झाल्याने त्याला लागणारे अन्न,घरटे बनवण्यासाठी काड्या हे सुद्धा त्यांना मिळण्याचे मुश्किल झाले. राणीच्या बगीचे मध्ये पक्षांना पाहण्यासाठी तिकीट काढून पाहण्यासाठी नक्की जातो पण मुक्तपणे संचार करणारे पक्षी आम्हाला आता नकोशी वाटत आहे.
या पृथ्वीतलावर आपला जन्म झाला आहे तर आपणही याचे नक्कीच देणे लागतो.
पक्षांची संख्या असेच कमी होत गेले तर आपल्याला याचा फारसा फरक पडणार नाही फक्त याचा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम नक्कीच होत जाईल हे मात्र आपल्याला परवडणारे नाही.
जर आपल्याला या सर्व गोष्टीच्या पुस्तकात पाहावयाची नसेल तर एखादी तरी झाड आपल्या घराच्या अंगणात अथवा शेजारी नक्कीच लाव.
त्या चिमण्यांना योग्य वातावरण तयार करा,शहरात अन्नपाण्याची गरज भागवणे कठीण असते त्यांची सोय नक्कीच करा.पक्ष्यान प्रति प्रेम आपुलकी आपल्या मुलांच्या मनात जागृत करा.
घराच्या रिकाम्या जागेत ते राहतील अशी त्यांची व्यवस्था नक्कीच करा.
आमच्या शर्विल च्या भेटीला रोज सकाळी चिमण्या नक्की घरी येतात त्यांचा चिवचिवाट इतकी छान असतो की सर्वांचं मन आनंदमय होतं आल्यासारखे ते घरात येऊन नुकसान तर करत नाहीत पण त्यांचा तो प्रेमळ आवाज आमच्या कानी नक्कीच देऊन जातात.
नक्कीच त्यांना काहीतरी सांगायचं असेल.....?
या व्हिडिओ
आपल्या घराच्या परिसरात असे काहीतरी घडत असेल तर नक्कीच शेअर करा....
#Beautiful_bird_sounds #nature #4k #save_the_bird #पक्षी_आणि_मी #video #मारुती_चित्तमपल्ली डॉक्टर #सलीम_अली:
#भारतीय_पक्षीशास्त्रज्ञ
@highlight
@everyone
No comments:
Post a Comment