Saturday, 18 November 2023

जुनी पेन्शन योजना येणार की नाही?उद्या येणार अहवाल;सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता

सन २००५ नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसंदर्भात नेमलेल्या तीन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल सोमवारी (दि.२०) सादर केला जाणार आहे.
या अहवालात काय असेल आणि त्यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार, याविषयी कर्मचारी,अधिकाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव सुबोधकुमार, सुधीर श्रीवास्तव आणि के.पी.बक्षी यांची ही समिती मार्च २०२३ मध्ये स्थापन करण्यात आली होती.
तीन महिन्यांत या समितीने अहवाल द्यायचा होता; पण तो अद्याप दिलेला नाही.
 राज्याचे मुख्य सचिव
मनोज सौनिक यांनी अलीकडेच राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
राज्य सरकारने समितीला वारंवार मुदतवाढ दिली;पण आता २० नोव्हेंबरपर्यंत ही समिती सरकारला अहवाल सादर करेल, असे मुख्य सचिव सौनिक यांनी या बैठकीत स्पष्ट केले
🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭🧭
बैठकीत मुख्य सचिवांनी दिलेली काही आश्वासने:-
■ वित्त विभागाने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार दीड लाख पदे भरणार,कार्यवाही सुरू.

◼️ सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन,

◼️८० वर्षे व त्यावरील वयाच्या पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे पेन्शन मिळण्याबाबतचा प्रस्ताव तपासून सादर करण्याच्या सूचना.

■ ग्रॅच्युईटीची सध्याची १४ लाख रुपये ही कमाल मर्यादा केंद्र सरकारच्या धर्तीवर २० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव मागविला.

◼️सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी अग्रीम कमाल मर्यादा वाढविण्याची मागणी तपासून कार्यवाही करणार.

■ महागाई भत्त्यात केंद्र सरकारप्रमाणे वाढ करण्याबाबत लवकरच कार्यवाही करणार.
💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣
जुनी आणि नवीन पेन्शन योजना काय आहे?

ही केंद्र सरकारची योजना आहे,ज्या अंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत मासिक पेन्शन दिली जाते.
या अंतर्गत, मासिक पेन्शनची रक्कम एखाद्या व्यक्तीने काढलेल्या शेवटच्या वेतनाच्या निम्म्या इतकी असते.
 तर नवीन पेन्शन योजना ही केंद्र सरकारची नवीन सेवानिवृत्ती योजना आहे, ज्यामध्ये लाभार्थी निवृत्तीनंतर जमा रकमेच्या ६०% रक्कम काढू शकतात.

१ जानेवारी २००४ पासून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली असून सरकारी कामात नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अनिवार्य करण्यात अली होती. 
त्याच वेळी, १ मे २००९ पासून ते सर्व नागरिकांसाठी ऐच्छिक तत्त्वावर देखील लागू केली गेली.
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
जुन्या पेन्शन योजनेला सरकारचा विरोध का?
जुन्या पेन्शन योजनेमुळे सरकारी तिजोरीवर अधिक बोजा पडतो.
या योजनेत कर्मचार्‍यांच्या पगारातून कोणतीही कपात होत नाही आणि संपूर्ण भार सरकारच्या तिजोरीवर टाकला जातो. त्यामुळे
 आपल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देताना सरकारच्या तिजोरीवर अधिक बोजा पडणार हे स्पष्ट आहे.
💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣
जुनी पेन्शन योजना कोणी बंद केली? (Who closed the old pension scheme?)
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने 31 ऑक्टोबर 2005 रोजी सुलतानी जीआर काढण्यात आला होता.
 त्यामध्ये त्यांनी शिक्षक सहित इतर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन (Old Pension Scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या जीवनातील खूप महत्त्वाची बाब आहे.
कारण निवृत्तीनंतरच्या जीवनाचा आर्थिक आधार म्हणून पेन्शनकडे पाहिले जाते.
अशा परिस्थितीत 31 ऑक्टोबर 2005 रोजी शासनाने कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील ही महत्त्वाची बाब हिरावून घेतली होती.
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
जुन्या पेन्शन योजनेचे फायदे कोणते होते?
१)जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्याच्या निम्मा पगार हा त्या कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून मिळत होते
२)जुने पेन्शन स्कीमनुसार निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जर मृत्यू झाला तर त्याच्या मागे त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना पेन्शन दिले जात होते.
३)या पेन्शन मधून कुठल्याही प्रकारची कपात केली जात नव्हती.
४)जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला मेडिकल भत्ता आणि मेडिकल बिल ची सुविधा दिली जात होते.
५)या योजनेचे अंतर्गत कर्मचारीला वीस लाख रुपयांची ग्रॅच्युईटी दिली जात होती.
💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣
नवीन पेन्शन योजना माहिती
१)NPS (New Pension Scheme)नवीन पेन्शन योजना नुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा टक्के रक्कम कपात केली जाते

२)नव्या पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर नेमकं किती पेन्शन मिळणार याची रक्कम निश्चित नसते

३)ही योजना शेअर बाजारावर आधारित आहे त्यामुळे योजना पूर्णपणे सुरक्षित नाही

४)जुनी पेन्शन योजनेत निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन हे सरकारी तिजोरीतून केले जात होत तर नव्या पेन्शन योजनेत ते शेअर बाजारावर अवलंबून आहेत त्यामुळे या मध्ये कराची ही तरतूद आहे

५)नवीन पेन्शन योजनेत निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी पेन्शन योजना निधीच्या 50% रक्कम अगोदर गुंतवावी लागते
NPS नवीन पेन्शन योजनेमध्ये सहा महिन्यांनी मिळणाऱ्या DA म्हणजेच महागाई भत्त्याची तरतूद नाही

६)निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची कोणतीही हमी देण्यात येणार नाही
📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡
rahulmhamane2407@gmail.com

No comments:

Post a Comment