Wednesday, 8 November 2023

पुन्हा एकदा येणार जुन्या पेन्शन वादळ;१७ लाख सरकारी कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर;जुन्या पेन्शन योजनेची मागणी; महामोर्चाद्वारे निवेदन

१७ लाख सरकारी कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर
जुन्या पेन्शन योजनेची मागणी
जुन्या पेन्शन योजनेची मागणी सरकारी आश्वासनानंतरही पूर्ण होत नसल्याने राज्यभरातील १७ लाख सकारी कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह बुधवारी आझाद मैदान तसेच जिल्हा व तालुका कार्यालयांत महामोर्चा काढला.
 दरम्यान, येत्या १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनांकडून देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारी-निमसरकारी
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय सिमितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली.
जुनी पेन्शनसंदर्भात 'अभ्यास समिती स्थापन करण्यात आली.
परंतु, ६ महिन्यांच्या कालावधीनंतरही
अपेक्षित अहवाल प्राप्त होऊ शकला नाही.
त्यामुळे राज्यातील कर्मचारी- शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याने उद्याच्या महामोर्चाची हाक सरकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसह
अन्य काही मागण्यांसाठी मार्च २०२३ मध्ये
राज्यातल्या १७ लाख सरकारी कर्मचारी
व शिक्षकांनी बेमुदत संप पुकारला होता.
त्यावेळेस शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप
पुकारला होता. 
ऐन अधिवेशनात पुकारण्यात
आलेल्या संपाची धग राज्य सरकारला लागली
होती.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सर्वांना पूर्वलक्षी
प्रभावाने सामाजिक व आर्थिक स्थैर्य देण्याचे
आश्वासन दिले होते आणि माजी सचिव सुबोध
कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
होती.
पण सहा महिने झाले तरी या समितीचा
अहवाल सरकारला मिळालेला नाही.
 त्यामुळे
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण
आहे.
🔴...अशा आहेत मागण्या
◼️ जुनी पेन्शन योजना लागू करा.

◼️पीएफआरडीए कायदा रद्द करा.

 ◼️सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत.

◼️केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाहतूक व शैक्षणिक भत्ता मिळावा.

◼️सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे
अशा मागण्या या महामोर्चाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔴सोलापूर-जिल्हा परिषदेसमोर जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सहकुटुंब महामोर्चा आंदोलन करण्यात आले. 
यानंतर सरकारी- निमसरकारी, जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका- नगरपरिपद कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी
कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड,विरूपाक्ष घेरडे, निमंत्रक अशोक इंदापुरे, अशोक जानराव, अमृत कोकाटे, किशोर सावळे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव, लिपिकवर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे, दिनेश वनसोडे, राजेश देशपांडे, लक्ष्मण वंजारी, अनिल विराजदार, सचिन सोनकांवळे, निर्मल पवार, सचिन मायनाळे, अशोक जानराव, शेपेराव शिरसट, वापू सदाफुले, गणेश अंजीखाने, अमर भिंगे, लक्ष्मण आयगोळे, पंकज गुरव आदी उपस्थित होते.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔴जुनी पेन्शन योजना कोणत्या राज्यात लागू आहे---
राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, झारखंड आणि आता हिमाचल प्रदेश सरकारांनी जुनी पेन्शन योजना ( Old Pension Scheme ) पुनर्संचयित केली आहे.
या पार्श्वभमीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment