उत्तरकाशीत मोठी दुर्भग कोसळला,
५० ते ६० मजूर अडकल्याची भीती
मजुरांना काढण्यासाठी बोगद्यात पाईप टाकणे सुरू
उत्तरकाशीच्या सिलवयारा- डंडालगांव मधील बोगद्यात भुस्खलन झाल्याने
दोन दिवसांपासून अडकलेल्या ४० मजुरांना बाहेर काढण्यासाठी
बचाव पथकाने मंगळवारी बोगद्यातील मलब्यात स्टील पाईप टाकण्याचे काम सुरू केले.
सर्व मजूर सुरक्षित असल्याचा दावा बचाव पथकाने केला आहे.
दरम्यान एका मजुराच्या मुलाने प्राणवायू पुरवठा करणाऱ्या पाईपच्या माध्यमातून
वडिलांशी संवाद साधून त्यांच्या सुखरुपेते विषयी माहिती घेतली.
बुधवारपर्यंत सर्व मजूर सुखरुप बाहेर येतील,असा विश्वास बचाव पथकाने व्यक्त केला आहे.
मजुरांना बाहेर काढण्यासाठी ड्रिलिंग करून तेथे पाईप टाकले जाणार आहेत.
९०० मिमी व्यासाचे
पाईप ड्रिलिंगच्या माध्यमातून आतमध्ये टाकण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री सकाळी घटनास्थळी पोहचली.
सर्व तज्ज्ञ अभियंते उपस्थित आहेत.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव रंजीत कुमार सिन्हा यांनीही मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत किंवा बुधवारपर्यंत श्रमिकांना बाहेर काढले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. बोगद्याजवळ तात्पूर्ते इस्पितळ उघडण्यात आले आहे.
येथे १० रुग्णवाहिका व डॉक्टरांची चमू तैनात आहे.
अडकलेल्या कामगारांना अन्न पदार्थापेक्षा प्राणवायूची गरज आहे. अडकलेल्या कामगारांनी प्राणवायू पुरवठा विनाअडथळा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
बचावकार्य करणाऱ्या चमूचे कर्मचारी कामगारांच्या सातत्याने संपर्कात आहेत.
एसडीआरएफ कमांडंट मणिकांत मिश्रा यांनी बॉकी टॉकीद्वारे कामगारांशी चर्चा केली.
बोगद्यात ४० कामगार अडकले त्याला ५० तासांहून अधिक काळ झाला आहे.
काल कामगारांशी संपर्क होत नव्हता त्यामुळे सगळे घाबरले होते.
मात्र, त्यानंतर रात्री ११ वाजता त्यांच्याशी संपर्क झाला,
अशी माहिती पीआरडी जवान रणवीर सिंह चौहान यांनी दिली. अडकलेल्या कामगारांना चिठ्ठीद्वारे संदेश पाठवण्यात आला. आतमध्ये जेवण पाठवण्यात आले.
ते कामगारांपर्यंत पोहोचले.
त्यांनी प्राणवायूची मागणी केली आहे.
मजुरांना निरंतर प्राणवायू पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
सरकारकडून या बोगद्याची जबाबदारी एनएचआयडीएसीएल कंपनीला देण्यात आली आहे.
या बोगद्याचे बांधकाम नवयुग या कंपनीकडे सोपवण्यात आल आहे.
बोगद्याच्या आतून २१ मीटरपर्यंतचा ढिगारा उपसण्यात आला आहे..
🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻
🟣असे असेल रेस्क्यू ऑपरेशन:-
◼️बोगद्याच्या बाजूला सुरुंग करून त्यात ९०० मिमी व्यासाचे पाइप टाकण्याची प्रक्रिया सुरू केली.
◼️यामुळे बोगद्याच्या अडकलेल्या भागात आडवे ड्रिलिंग केले जाईल.
◼️आगर मशीनद्वारे ९०० मिमी रुंद पाईप टाकण्याचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत.
◼️पाईप ढिगाऱ्यााच्या आत सोडून यातून मजुरांना बाहेर काढले जाणार आहे.
◼️बोगद्यात पडलेल्या ढिगाऱ्यातून पाईप आडवे सोडण्यासाठी तयारी केली जात आहे.
◼️यासाठी ड्रिलिंग मशिनच्या माध्यमातून छिद्र पाडले जाईल.
पाईप आतमध्ये पोहोचल्यास याच्यामधून मजूर बाहेर येऊ शकतील.
यासाठी बचावपथक रात्रंदिवस काम करत आहे.
🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻🗻
🟣सर्वजण सुरक्षित:-
बोगद्यात अडकून पडलेले सर्व मजूर सुरक्षित आहेत.
त्यांना पाइपलाइनद्वारे भोजन व ऑक्सिजन पुरवला जात आहे.
वॉकीटॉकीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत संपर्क केला जात आहेत.
बोगद्यात अडकून पडलेले मजूर प्रामुख्याने
बिहार,झारखंड,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल,ओडिसा, उत्तराखंड व हिमाचलचे आहेत.
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
🟣नेत्यांच्या भेटीमुळे अडथळा:-
मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मात्र दुर्घटनास्थळी स्थानिक नेते वारंवार येत असल्यामुळे या मदतकार्यात अडथळा येत आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी जी. एल.नाथ यांनी दिली.
🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋
🟣पंतप्रधानांनी घेतली मदतकार्याची माहिती:-
अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धानी यांच्याकडून उत्तरकाशीतील घटनेची माहिती घेतली.
पंतप्रधानांनी मुख्यमंत्री धामी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या घटनेनंतर आपण सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे धामी यांनी सांगितले.
Rahul2407.blogspot.com
No comments:
Post a Comment