Wednesday, 22 November 2023

शिष्यवृत्तीच्या बनावट अर्जांना यापुढे लागणार लगाम;नोडल अधिकाऱ्यांचे केले जाणार बायोमेट्रिक प्रमाणीकरण

शिष्यवृत्तीच्या बनावट अर्जांना यापुढे लागणार लगाम...
नोडल अधिकाऱ्यांचे केले जाणार बायोमेट्रिक प्रमाणीकरण
विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी दाखवून सरकारी शिष्यवृत्ती लाटण्याच्या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी एनएमएमएस आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीकरिता नोडल अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारकडून आर्थिक दुर्बल घटकांना एनएमएमएस आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती दिली जाते. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (एनएसपी) दोन्ही योजनांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरायचे आहेत. त्याकरिता शाळेचे जे अधिकारी विद्यार्थ्यांकडून अर्ज दाखल करतील त्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेवरून ही खबरदारी प्रथमच घेण्यात येत आहे. शाळास्तरावर १५ डिसेंबरपर्यंत तर जिल्हास्तरावर ३० डिसेंबरपर्यंत नोडल अधिकाऱ्यांनी अर्जाची पडताळणी करायची आहे.🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬🪬
⭕काय काळजी घ्याल?
◼️एनएमएमएस शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांचे नाव व जन्मतारीख आधारनुसार असावी

■ निकालपत्रकातील नाव व जन्मतारीख यात दुरुस्ती असल्यास नववीच्या नवीन विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळांनी शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत पाठवावे.

◼️दिव्यांगत्वाचा प्रकार यूडीआयडी ओळखपत्र आणि एनएसपी पोर्टलवरील अर्ज यात एकसमान असावा.
📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒
⭕कुणाची बायोमॅट्रिक:-
शाळा प्रमुख (एच.ओ.आय),
नोडल अधिकारी (आय.एन.ओ), जिल्हा शिक्षणाधिकारी (डी.एन.ओ) आणि राज्य नोडल अधिकारी (एस.एन.ओ)

शाळांनी एन.एस.पी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दरवर्षी
प्रोफाइल अद्ययावत करणे आवश्यक आहे. 
तसेच केवायसी पडताळणी एकदाच करून घेणे आवश्यक आहे.
 विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, त्या शाळेमधूनच ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.
- राजेश क्षीरसागर, उपसंचालक, योजना शिक्षण
👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻
⭕२.६६ लाख विद्यार्थी देणार 'एनएमएमएस'साठी परीक्षा:-
एनएमएमएस शिष्यवृत्तीकरिता राज्य परीक्षा परिषदेकडून आठवीच्या विद्यार्थाची परीक्षा घेण्यात येते. २४ डिसेंबरला ही परीक्षा ७३० केंद्रांवर होणार असून,यासाठी १३ हजार ५२३ शाळातील २ लाख ६६ हजार २०२ विद्यार्थी बसणार आहेत.
🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻
⭕महाराष्ट्र NMMS परिक्षाला अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
इयत्ता आठवीच्या कोणताही regular असणारा विद्यार्थी इयत्ता 7 वी मध्ये total 55% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केल्यास तो ही परीक्षा देऊ शकतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेमध्ये 5% सूट असेल.
उमेदवाराने सरकारी किंवा सरकारी मध्ये शिकत असलेल्या शाळेत नोंदणी केलेली असावी. विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याने त्या शाळेत नोंदणी केलेली असावी.
जो विद्यार्थी या Scholorship साठी apply करत आहे त्याच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे.
9 वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी किमान 55% मार्क्सने पास होणे आवश्यक आहे SC/ST कॅटेगिरी साठी 5% उत्तीर्ण केलेले असावी.
विद्यार्थ्याने 10वी मध्ये कमीत-कमी 60% गुण मिळवलेले असावे. SC/ST साठी 5% किंवा 11वी किंवा 12वी मधील nmms Scholorship सुरू ठेवण्यासाठी marks जास्त असणे आवश्यक आहे
विद्यार्थ्याचं मागील वर्गाचे cbsc result किंवा इतर अन्न board चे result जाहीर होण्याचा 3 महिन्याच्या आत विद्यार्थ्यांनी पुढील class मध्ये प्रवेश मिळवणे आवश्यक आहे.
👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻
⭕NMMS शिष्यवृत्ती 2023 अर्ज कसा करावा?:-
इयत्ता 9 आणि 12 मधील विद्यार्थी NMMS योजनेसाठी scholarship.gov.in
या NSP वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.
नोंदणीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2023 आहे. विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात: Scholarships.gov.in. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे.
🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍💻
⭕शिष्यवृत्ती बँक खात्यात होणार जमा:-
एनएमएमएस शिष्यवृत्तीधारकास इ.९ वी ते १२ वी या चार वर्षांत प्रतिवर्षी रक्कम रु. १२ हजार तर दिव्यांग शिष्यवृत्तीधारकास इ. ९ व १० वी करिता रक्कम रु. ९ हजार ते १४ हजार ६०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीची रक्कम आधार कार्डला लिंक असलेल्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते. बँक खाते व मोबाइल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, असे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.
👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻

⭕NMMS Exam ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी होण्याऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 12,000 एवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे 8वी ते 12 वी पर्यंत एकूण 48,000 रु मिळते.
👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻
⭕Nmms परीक्षेत किती विषय असतात?
(a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
३. गणित ( एकूण गुण २०) असे तीन विषय असतील या तीन विषयांचे एकूण १० प्रश्न सोडवायचे असतात. उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻
⭕NMMS Exam शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम:-
NMMS Exam शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २ विषय असतात.

१) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT)

२) शालेय क्षमता चाचणी (SAT)

१) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT)
बौध्दिक क्षमता चाचणी ही एक प्रकारे मानशास्त्रीय चाचणी असून,त्यामध्ये कार्यकारणभाव,विश्लेषण,संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

२) शालेय क्षमता चाचणी (SAT)

शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असते. त्यामध्ये

१. सामान्य विज्ञान एकूण (गुण- ३५)

२. समाजशास्त्र (एकूण गुण - ३५)

३. गणित (एकूण गुण - २०) असे तीन विषय असतात.
या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे
⭕सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
⭕समाजशास्त्र ३५ गुण:- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण गणित २० गुण.

No comments:

Post a Comment