उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील निर्माणाधीन असेलल्या बोगद्यामध्ये बांधकामाचा काही भाग रविवारी (१२ नोव्हेंबर) कोसळून ४१ कामगार आतमध्ये अडकले.
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
१७ दिवस,४१ कामगार;ऑस्ट्रेलियन व्यक्तीची ठरली मोलाची मदत अर्नॉल्ड डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशन (जिनेव्हा) चे अध्यक्ष आहेत.
तसंच त्यांच्याकडे भूगर्भशास्त्रज्ञ,अभियंता आणि वकील यासारख्या इतर पदव्याही आहेत.
उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी बाहेर काढण्यात यश आलं आहे.
या अतिमहत्त्वाच्या आणि आव्हानात्मक ठरलेल्या ऑपरेशनसाठी देशातील विविध यंत्रणा कार्यरत होत्या.
तसंच,अनेक आंतरराष्ट्रीय यंत्रणांनीही त्यांचे प्रयत्न पणाला लावले होते.
ऑस्ट्रेलिअन असलेले डिक्स हे जिनिव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख आहेत.
भूमिगत बांधकामाशी संबंधित कायदेशीर,पर्यावरणीय,राजकीय जोखीम ते स्वीकारतात.
❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓
अर्नाल्डो डिक्स कोण आहे?
उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी बाहेर काढण्यात यश आलं आहे. या अतिमहत्त्वाच्या आणि आव्हानात्मक ठरलेल्या ऑपरेशनसाठी देशातील विविध यंत्रणा कार्यरत होत्या.
तसंच, अनेक आंतरराष्ट्रीय यंत्रणांनीही त्यांचे प्रयत्न पणाला लावले होते.
यामध्ये आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नॉल्ड डिक्स यांचाही समावेश होता. ऑस्ट्रेलिअन असलेले डिक्स हे जिनिव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख आहेत.
भूमिगत बांधकामाशी संबंधित कायदेशीर,पर्यावरणीय, राजकीय जोखीम ते स्वीकारतात.
अर्नॉल्ड डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशन (जिनेव्हा) चे अध्यक्ष आहेत.
तसंच त्यांच्याकडे भूगर्भशास्त्रज्ञ, अभियंता आणि वकील यासारख्या इतर पदव्याही आहेत.
अर्नॉल्ड डिक्स यांनी मेलबर्न येथील मोनाश विद्यापीठातून विज्ञान आणि कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या संकेतस्थळावरील माहितीवरून ते कुशल वकील असल्याचंही सांगितलं जातंय.
या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याच्या ऑपरेशनमध्ये अर्नॉल्ड डिक्स २० नोव्हेंबर रोजी दाखल झाले होते.
गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ अर्नॉल्ड डिक्स कार्यरत आहेत.
या तीन दशकांत त्यांनी अनेक भूमिका बजावल्या आहेत. भूमिगत सुरक्षेबाबत त्यांचं कार्य मोलाचं ठरलं आहे.
२०१६ ते २०१९ या काळात त्यांनी कतार रेड क्रिसेंट सोसायटी (QRCS) मध्ये स्वयंसेवकाचे कार्य देखील केले. २०२० मध्ये,अर्नॉल्ड डिक्स यांनी लॉर्ड रॉबर्ट मायर पीटर विकरी QC मध्ये सामील होऊन अंडरग्राउंड वर्क्स चेंबर्स तयार केले. ते भूगर्भातील जटिल आणि गंभीर आव्हानांसाठी तांत्रिक आणि नियामक पर्याय सुचवतात.
आज बचावकार्याला सुरुवात केल्यानंतर ते म्हणाले होते की, बचाव कार्य पूर्णत्वास येत असल्याने बरे वाटत आहे.
रॅट होल मायनिंग तज्ज्ञांनी शेवटचे काही मीटर ढिगाऱ्यातून खणून काढले.
तसंच,या पर्वताने आम्हाला नम्रपणा शिकवला असल्याचंही ते म्हणाले..
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते.
तांत्रिक पद्धतीने त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू असताना अनेकांनी देवाकडेही प्रार्थना सुरू ठेवली होती.
त्याचप्रमाणे अर्नॉल्ड डिक्स यांनीही त्याच्या पद्धतीनुसार,देवाकडे प्रार्थना केली होती.
ख्रिसमसपर्यंत अडकलेल्या ४१ कामगारांना घरी पोहोचवण्याचं त्यांचं उद्दीष्ट्य होतं.
परंतु,त्यांचं हे उद्दीष्ट्य त्याआधीच पूर्ण झालं. तसंच, दरम्यान, डिक्स यांनी बचाव कार्यातील प्रगतीला विलक्षण म्हटले होते.
🕉️🕉️🕉️☮️✝️☪️☸️🪯✡️🔯🕎☯️☦️🛐
दुवा भी जरुरी है...
मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असताना बोगद्याबाहेर भगवान बौख नाग देवतेची पुजा केली गेली. त्यावेळी अरनॉल्ड डिक्स बोगद्याजवळ पोहचले आणि भगवान बौख नाग देवतेच्या पुजेत सहभागी झाले.
अशा परिस्थितीत अडकलेल्या लोकांचं मनोबल वाढवणं ही सर्वात मोठी गरज असते. नाहीतर मानसिकरित्या मोठा परिणाम होऊ शकतो, असं अर्नोल्ड डिक्स (Arnold Dix) यांनी म्हटलं आहे.
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
काय म्हणाले नरेंद्र मोदी?PM Modi
Tweet On Uttarkashi Tunnel Rescue)
उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावुक करत आहे.
बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आणि चांगले आरोग्य इच्छितो.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजणांना भेटणार आहेत ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कौतुक करता येणार नाही.
या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांच्या कार्याला मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि जिद्दीने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण समोर ठेवले आहे.
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮
बोगद्याच्या आतला भाग कोसळण्याचे कारण काय?
बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून २०० ते ३०० मीटर आतमध्ये काही भाग कोसळला.
भुसभुशीत झालेल्या वरच्या भागातून दगडाचा भाग कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. बांधकामाच्या वेळेस बोगद्यात वरच्या बाजूला ठिसूळ झालेला भाग कदाचित दिसून आला नसेल.
नाजूक किंवा भग्न खडकांचा या भागात समावेश असू शकतो. भेगा पडलेल्या या खडकांमुळे हा भाग खाली कोसळला,अशी शक्यता मनोज गर्नायक यांनी व्यक्त केली.
दुर्घटनेचे आणखी एक कारण म्हणजे भेगा पडलेल्या खडकांमधून पाण्याची गळती होत असण्याची शक्यता आहे. सैल झालेल्या खडकांमधून पाणी आपला रस्ता तयार करते; ज्यामुळे बोगद्याच्या वरच्या बाजूला एक प्रकारची पोकळी निर्माण होते,जी खालून दिसत नाही.
बोगद्यातील दुर्घटनेबाबतचे हे सामान्य अंदाज आहेत;ज्यावेळी सर्वसमावेशक तपासणी पूर्ण होईल,त्यावेळी याबाबत अधिक खुलासा करता येईल,असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment