Friday, 27 October 2023

कोजागिरी पौर्णिमा पौराणिक कथा/शास्त्रीय कारण माहितीय?---------

🌼प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. 
ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात
ती तिच्या पतीची निंदा करत असे.
 पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. 
एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती.
 एकदा श्राद्ध करताना
ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले.
 पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला.
जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात.
 त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. 
ब्राह्मणाने
विधिव्रत कोजागर व्रत केले.
या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. 
भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
🍁कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध पिण्याचं शास्त्रीय कारण माहितीय?---------
आश्विन महिन्यातील पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.
असे मानले जाते की या दिवसापासून शरद ऋतू म्हणजे हिवाळा सुरू होतो.
 शरद पौर्णिमेच्या रात्री लोक खीर बनवतात आणि मोकळ्या आकाशाखाली ठेवतात आणि प्रसाद म्हणून या खीरीचे सेवन करण्यात येते.
आश्विन महिन्यातील पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.
 असे मानले जाते की या दिवसापासून शरद ऋतू म्हणजे हिवाळा सुरू होतो.
 शरद पौर्णिमेच्या रात्री लोक खीर बनवतात आणि मोकळ्या आकाशाखाली ठेवतात आणि प्रसाद म्हणून या खीरीचे सेवन करण्यात येते. 
खीरीचे अनेक फायदे सांगितले जातात.
 चला तर मग या मागिल वैज्ञानिक कारण जाणून घ्या
🍁खीर ठेवण्याचे हे शास्त्रीय कारण आहे----
खरंतर चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवण्याला वैज्ञानिक महत्त्व आहे. वास्तविक, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो.
 अशा स्थितीत चंद्राच्या किरणांचे रासायनिक घटक पृथ्वीवर पडतात. 
अशा परिस्थितीत जर खीर संपूर्ण रात्र चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवली गेली तर ते घटक खीरमध्ये शोषले जातात. 
या रासायनिक घटकांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. 
ही खीर खाल्ल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याला त्वचा रोग, कफ संबंधित विकार आणि श्वसनाशी संबंधित समस्यांपासून स्वातंत्र्य मिळते. 
असे मानले जाते की जर ही खीर चांदीच्या भांड्यात ठेवली तर त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात.

No comments:

Post a Comment