Wednesday, 4 October 2023

राज्यातील ७ लाख ४० हजार विद्यार्थी 'आधार' विना


६ लाख ७० हजार विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये विसंगती
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आधारनोंदणी आणि अद्ययावतीकरणाबाबत वारंवार सूचना देऊनही राज्यातील तब्बल सात लाख ४० हजार १७६ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे, तर सहा लाख ७० हजार -७२ विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास
आले आहे.
शिष्यवृत्ती योजना, तसेच शाळांना विद्यार्थी संख्येनुसार अनुदान देण्यात येते. 
त्यामुळे बोगस पटसंख्या रोखण्यासह आधारनुसार योजनांचे
लाभ देण्यासाठी राज्यात पहिली 
ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शाळांना विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती 
स्टुडंट्स 
पोर्टलमध्ये नोंदवण्याची सक्ती करण्यात आली. 
मात्र अद्याप हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. शिक्षण विभागाकडून शाळांची संचमान्यताही आधार संख्येवरच केली जाणार असल्याने ते कामही अद्याप ही पूर्ण होऊ शकले नाही.
विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक वाटप, शालेय पोषण आहार, विविध प्रकारच्या लाभ देण्यासाठी राज्यातील पहिली कार्डवरील माहिती स्टुडंट प्रलंबित राहिले आहे.
💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
🏮'विसंगती शाळांनी दूर करावी':---
शिक्षण विभागाच्या सरल संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यात दोन कोटी सात लाख ७७ हजार ६३९ विद्याथ्यांपैकी दोन कोटी ३७ हजार ४६३ विद्यार्थ्यांची माहिती स्टुडंट पोर्टलवर भरण्यात आली. त्यांपैकी एक कोटी ८८ लाख २६ हजार २१८ विद्यार्थ्यांची आधार कार्डवरील माहिती वैध ठरली आहे. 
तर सहा लाख ७० हजार ७२ विद्यार्थ्यांची सरल संकेतस्थळावरील माहिती आणि आधार कार्डवरील माहिती विसंगत आहे.
या माहितीमधील विसंगती शाळांनी दूर करण्याबाबत स्पष्ट केले आहे.
"लोकसत्ता लोकमान्य लोकशक्ती

No comments:

Post a Comment