Wednesday, 25 October 2023

सोलापूर मध्ये फाईलिला पाय फुटले;पूर्वी माध्यमिक विभागाचे फाईल झाले होते गायब,आता प्राथमिकचे ही फाईल होत आहेत गायब......

📚आवक-जावक नोंदवही गहाळ प्रकरण : तत्‍कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल
जावक नोंदवही गहाळप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह तत्कालीन तीन प्रमुख लिपिकांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवार रात्री उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
भास्करराव बाबर, सुलभा वठारे, जावेद शेख, विद्या शिंदे, जे. एस. शिवशरण या तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह सुरेश किसन देवकर, राजेंद्र सोनकांबळे, मुदस्सर शिरवळ या प्रमुख लिपिकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
📚तत्कालीन शिक्षणाधिकारी विद्या शिंदे, जे. एस. शिवशरण यांच्या कालावधीतील कॅम्पमध्ये शाळांच्या टप्पा अनुदानास वैयक्तिक मान्यता दिल्याचे आदेशावरून दिसते.
 परंतु, या प्रकरणाच्या चौकशीत त्या कालावधीतील कॅम्प नोंदवही, आवक जावक - नोंदवही शिक्षणाधिकारी कार्यालयात आढळत नाहीत.
याप्रकरणी तत्कालीन लिपिक सोनकांबळे, तत्कालीन कनिष्ठ सहायक शिरवळ, लोकसेवा प्रशालेचे मुख्य लिपिक देवकर यांना १५ सप्टेंबर २०२३ रोजी नोटिसा काढल्या. त्यात त्यांच्याकडे कोणता पदभार होता,तो कोणाला हस्तांतरित केला व कार्यभार सोपविला याची विचारणा केली होती. त्याविषयीची कागदपत्रे १७ सप्टेंबरपूर्वी सादर करण्याची मुदत दिली होती.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
📒आता आवक- जावक नोंदवह्या गहाळ : मान्यता असलेल्यांचेही रेकॉर्ड जुळेना---
'प्राथमिक'च्या मान्यताही संशयात
सोलापूर, ता. २५ जिल्ह्यातील २० टक्के टप्पा अनुदानाच्या १० शाळा आणि २५ तुकड्यांवरील १५३ पैकी केवळ १२ शिक्षकांचेच रेकॉर्ड क्लेअर असल्याने त्यांना शालार्थ आयडी मिळाला. पण, १४१ शिक्षकांना अजून तो मिळालेला नाही. त्यातील ७० शिक्षकांचे प्रस्ताव प्राथमिक शिक्षण कार्यालयाकडे प्राप्त झाले, पण अनेकांच्या मान्यतेचे रेकॉर्डच सापडत नाही.
📚 त्यामुळे पैसे घेऊन अर्धवट कागदपत्रांवर मान्यता दिल्याचा संशय निर्माण झाला असून आता पोलिसांत तपासांत या बाबी समोर येतील,
असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
📚खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान देण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री
जिल्हा परिषद दीपक केसरकर यांनी घेतला. 

त्यासाठी जवळपास सोळाशे कोटींचा निधीही दिला. 
परंतु अजूनपर्यंत अनेक शाळांमधील शिक्षकांना शालार्थ आयडी मिळालेला नाही. सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागातील २९८ शिक्षकासह प्राथमिक विभागातील १४१ शिक्षकांचा विषय अजूनही प्रलंबितच आहे. 
📚आता माध्यमिक शिक्षण विभागातील सात आवक जावक नोंदवह्या गहाळ झाल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत एफआयआर दाखल झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक
स्तरावरून २९८ शिक्षकांच्या शालार्थ आयडीसंदर्भातील कार्यवाही सुरु झाली आहे. 

त्यावेळी अन्य कागदपत्रांचा आधार घेतला जात आहे. काही
दिवसांत ज्यांच्याकडे अन्य २२ 
पुरावे आहेत, त्यांना शालार्थ आयडी मिळेल, असे उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
फिर्यादीत कोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची असणार नावे---
■ आता प्राथमिक शिक्षण विभागाकडेही २००९ पासूनचे तीन ते चार नोंदवह्या गहाळ झाल्याची बाब समोर आल्याने तत्कालीन अधिकारी संशयाच्या भोक्यात अडकले आहेत. कार्यालयातील सर्व नोंदवह्या आहेत, पण शिक्षक मान्यतेची माहिती असलेल्याच नोंदवह्या गहाळ कशा होतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
आता या प्रकरणी देखील पोलिसांत फिर्याद दाखल होणार आहे. त्यामध्ये कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
प्राथमिक शिक्षण विभागातील काही आवक जावक नोंदवह्या सापडत नाहीत. 
दुसरीकडे काही शिक्षकांच्या मान्यतेचे रेकॉर्ड आहे. 
पण आवक जावक नोंदवह्यातील नोंदी व मान्यतेवरील नोंदी जुळत नाहीत. 
या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून पोलिसांत फिर्याद देण्याची कारवाई होईल.
- प्रसाद मिरकले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सकाळ वृत्तसेवा सोलापूर 

No comments:

Post a Comment