बाबमहाराज सातारकर यांचे निधन, वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन झाले.
त्यांच्या अनोख्या कीर्तन शैलीच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्म आणि संप्रदायाचा विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला.
वयाच्या ८९ वर्षी बाबामहाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला. जगभरात त्यांच्या कीर्तनाचे भरपूर कार्यक्रम झाले.
महाराष्ट्राच्या गावागावांत त्यांच्या कीर्तनाचे अनेक कार्यक्रम झाले.
नवी मुंबईतील नेरूळमध्ये ते वास्तव्यास होते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ३ वाजता नेरूळच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं.
बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नसल्याने त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत.
🔴जीवन –
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी सातार्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव श्री ज्ञानेश्वर आणि आईचे नाव माता लक्ष्मीबाई आहे.
बालपणी त्यांना घोडेसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वात अभ्यासाबरोबरच रस होता. फोटोग्राफी त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसर, अनोख्या रचनांची त्यांची आवड, लाकूड, दगड, चित्रे, इमारती आणि प्रसंगी जुळीतही उठुन दिसते.
सदगुरु दादा महाराज त्यांचे आजोबा आहेत. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती.
२४ मार्च सन १९५४ साली देशमुख दिंडीचे वीणेकरी श्री पांडुरंग जाधव यांच्या सुलक्षणी नात दुर्गा हिने एका गोरज मुहूर्तावर सकलसौभाग्यसंपन्न रुक्मिणी बनून महाराजांच्या जीवनात लक्ष्मीच्या पाऊलांनीं पदार्पण केले.
त्यांच्या संसारवेलीवर सम १९५८ ला भगवती, १९६२ ला रासेश्वरी, सन १९६३ ला चैतन्य अशी फुले ऊमलली. एक भाग्यशाली संसार विश्वकल्याणार्थ अवतीर्ण झाला.
महाराज यांचा एकुलता एक तरूण मुलगा चैतन्य त्यांचा अकस्मात कारणामुळे मृत्यू झाला.
सातारकरांची वारकरी परंपरा
श्रीक्षेत्र पंढरपूर वारी
पंढरपूरची वारी महाराष्टाचे एक आगळे वेगळे नवल विशेष आहे.
विश्वाला आनंद,आश्चर्य देणारी ही वारी आषाढी आणि कार्तिकीला शुध्द एकादशीला संपन्न होते.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बाबामहाराज सातारकर : (५ फेब्रुवारी १९३६). महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला.
त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले.
बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी पखवाज वादनाचे शिक्षण घेतले. २६ मार्च १९५४ रोजी बाबा महाराजांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला. १९५० ते १९५४ या काळात बाबामहाराज यांनी लाकूड सामानाचा (फर्निचर) व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला.
सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली.
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश अशा राज्यात कीर्तन – प्रवचनांचे शेकडो कार्यक्रम त्यांनी केले. १९७४ साली श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबई, आळंदी, पंढरपूर येथे कीर्तन महोत्सवांचे आयोजन त्यांनी केले. १९८० ते १९९९ या कालावधीत ज्ञानेश्वरीची प्रवचने त्यांनी केली. १९९८ ते २००१ या कालावधीत अमृतानुभवावर प्रवचने केली. डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.
भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात. १९८६ साली लंडन येथे हिंदीतून चार प्रवचने तसेच अमेरिकेत बोस्टन, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, आरलँडो आदी ठिकाणी १४ ज्ञानेश्वरी प्रवचने बाबामहाराजांनी केली आहेत.
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
श्री बाबामहाराज सातारकर यांना मिळालेले पुरस्कार-----
१. श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार,
२. महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार,
३. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट,तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे.
४. पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
श्री बाबामहाराज सातारकर यांचे ट्रस्ट
१. श्री चैतन्य आध्यत्मिक ज्ञान प्रसार संस्था – १९८३ साली
२. श्री बाबामहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान – १९९० साली
या दोन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री बाबामहाराज सातारकर आहेत.
No comments:
Post a Comment