सरकारी फतव्यापुढे शिक्षक हतबल, खासगी प्राथमिकमधील विद्यार्थ्यांच्या खर्चाचे ओझे शिक्षकांवरच
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
एका समस्येतून सुटका करून घेईपर्यंत शिक्षकांना दुसऱ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
आता शासनाने युडायस - २३ (युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस) मध्ये विद्यार्थ्यांविषयी विविध माहिती मरण्याचा फतवा काढला आहे. यात विद्यार्थ्यांचा रक्तगट मरण्याचे टेन्शन शिक्षकांना आले आहे.
खासगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा रक्तगट पाहण्यासाठी आता संबंधित शाळांमधील शिक्षकावरच आर्थिक बोजा पडणार महापालिकेच्या आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांची रक्तगट करण्याची सोय व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
युडायसमध्ये रक्तगट भरला नाही तर माहिती अपलोड होणार नाही त्यामुळे शिक्षक विवंचनेत आहेत
शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्वात मोठ्या व्यवस्थापन माहिती प्रणालींपैकी युडायस प्लस ही एक आहे.
यू डायस प्लस या पोर्टलवर
विद्याथ्यांची माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पोर्टल वर आता विद्यार्थ्यांचा रक्तगट, उंची व वजन ई मेल व भ्रमणध्वनी असल्याने क्रमांक या माहितीचे पाच अतिरिक्त स्तंभ पूर्ण केल्याशिवाय माहिती तपासणी अद्ययावत होणार नसल्याचे समजते, याला आता आणखीन एक पर्याय देण्यात आला आहे. मात्र रक्तगट भरणे आवश्यकच आहे.
सध्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच जिल्हा ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्याचा रक्तगट तपासण्याची सोय करण्यात आली
आहे. तर नगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीत त्यांच्या रुग्णालयांत ही व्यवस्था करून देण्यात आली आहे. शिवाय महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्याची महापालिकेच्या आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात येत आहे. परंतु शहरातील खासगी प्राथमिक माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणे शिक्षकांसाठी एक आव्हान बनले आहे.
या विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासण्यासाठी शिक्षकांनाच आर्थिक मुदंड बसत आहे.
त्यामुळे आता प्राथमिक शाळांमधील शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत
२५ ऑक्टोबरपर्यंत ही माहिती अद्ययावत करावयाच्या सूचना शिक्षण विभागाच्या असल्या तरी रक्तगट तपासणी एवढ्या लवकर होणे शक्य नसल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली भारत सरकार मार्फत ऑनलाइन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
या प्रणालीद्वारे राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमांच्या अभ्यासक्रमांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. अंतिम केलेली माहिती जिल्हास्तरावरून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयास सादर करण्यात येते.
या योजना राबवणे अनुदान वाटप करणे यांची नियोजन व्यवस्थित करता यावी
यासाठी शाळांची सविस्तर माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी यासाठी यु- निकाल, डायस प्लस प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या यु-डायस प्रणालीमध्ये शाळेचा तपशील, शालेय इमारत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती नवीन प्रवेश, विद्यार्थ्यांना पुनर्प्रवेश विद्यार्थ्यांना मोफत पुरवठा करण्यात आलेल्या बाबींचा तपशील मागील शैक्षणिक वर्षातील प्राथमिक स्तरावरील वार्षिक परीक्षेचा निकाल, मागील शैक्षणिक वर्षातील शाळेचा माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेला शाळेला मिळालेल्या अनुदानाचा तपशील इत्यादी माहिती व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती या यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अपडेट करण्यात येते. सरकाराची माहिती जमा करण्याची संकल्पना चांगली असली तरी रक्तगट तपासणीचा पेच मात्र शिक्षकांसमोर आहे. त्यामुळे यावर शिक्षणाधिकारी यांनी लक्ष घालून तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा शिक्षक, पालकांमधूनही व्यक्त
होत आहे.
🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
शासकीय यंत्रणेमार्फत व्यवस्था करावी
यू डायस प्लसमध्ये विद्याव्यांच्या रक्तगटाची नोंद करण्याच्या सूचना शाळांना प्राप्त झाल्या अहेत,
खासगी प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशासनामार्फत पत्र देण्यात यावे,
अशी विनंती प्रशासनाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांना करण्यात आली आहे शहर व जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी शासकीय यंत्रणेमार्फत मोफत करण्यात यावी.
- सुनील चव्हाण, प्रदेश महासचिव, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
तरुण भारत सोलापूर
विजयकुमार देशपांडे सोलापूर
No comments:
Post a Comment