Wednesday, 4 October 2023

गुरूजींचा आक्रोश ऐकणार कोण...?

..... गुरूजींचा आक्रोश ऐकणार कोण...?
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
गुरुजी अर्थात शिक्षक हे पूर्वीपासून सर्व समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून
ओळखले जाते. 
गुरुजी या शब्दातच खूप मोठी ताकद आणि आपुलकी आहे.
नवीन "पिढी घडविण्याचे शिवधनुष्य हे गुरुजी मोठ्या हिमतीने उचलतात. म्हणून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 
भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात शिक्षकांकडे एका वेगळ्या भावनेने आणि अपेक्षेने पाहिले जाते.
घरातून मूल एकदा का शाळेत गेले की, पालक निवांत असतात.
परंतु त्या कोवळ्या मुलांवर संस्कार करण्याची ज्या प्रमाणे आई-वडिलांची जबाबदारी असते, त्या पेक्षा कितीतरी अधिक पट ही त्या- त्या शाळेतील शिक्षकांवर येते.
त्यामुळे शिक्षक हा समाजातील अत्यंत महत्वाचा आणि समाजाला दिशा देणारा घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते
 नाही म्हटले तरी पोटात दुखते. 
परंतु मुलांच्या आणि तेही खोडकर मुलांच्या सानिध्यात अन्य कर्मचारी एक तासभरही थांबू शकत नाहीत, तेथे शिक्षक हे त्यांच्या सोबत किमान पाच तास असतात आणि ते देखील त्यांन हसून खिळून शिकवावे लागते. 
आणि समाजाला दिशा देणारा घटक म्हणून ही कसरत दुर्लक्षित केली जाते. आज या
शिक्षकांवर बोलण्याचे एवढे काय आहे, हे सर्वसामान्यांना एक कोडे वाटेल.
 परंतु त्यांच्या मागण्यासाठी ऐन महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी जालन्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने थेट आक्रोश मोर्चाच काढला. 
तो जिल्हाअधिकारी कार्यालयावर ज्यावेळी धडकला आणि तेथे ज्या-ज्या शिक्षकांनी आपले मनोगत मांडली ते ऐकून सुजाण नागरिक सरकारवर न चिडल्यासच नवल. 
विशेष म्हणजे शासकीय सुटीच्या दिवशी या मोर्चात संघटनेच्या दाव्यानुसार दोन हजार शिक्षक सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. यावरून त्यांच्या मागण्या किती पोटतिडकीच्या असतील हे समजून घेतले पाहिजे. 
त्यात प्रामुख्याने
 ⭕२००५ नंतर शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी 
⭕वरिष्ठ वेतनातील
त्रुटी दूर कराव्यात
⭕मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी
⭕वस्ती शाळांची मूळसेवा ग्राह्य धरण्यात यावी यासह अन्य मागण्याचा समावेश होता.
स्वातही अशैक्षणिक कामांच्या जोखडातून आधी मुक्त करावे ही देखील एक प्रमुख मागणी आहे. 
केंद्र अथवा राज्य सरकारची कुठलीही योजना आली की, सर्वप्रथम ती राबविण्याची जबाबदारी ही शिक्षकांवरच लादली जाते. 
मध्यंतरी खिचडी शिजवणे, ती मुलांना वाटणे.
⭕गावात कचऱ्याचे ढिग किती आहेत. याचे सर्वेक्षण करणे यासह अन्य योजनांचा श्रीगणेशाच शिक्षकांकडून केला जातो. 
हे कुठेतरी थांबविले पाहिजे. 
नसता शाळांचा उत्कृष्ट निकालही चांगला हवा आणि अन्य अशैक्षणिक कामेही झालीच पाहिजेत यामुळे शिक्षक बेजार असतात. त्यातूनही कसे वाचायचे हे शिक्षकांमधील काही हुशारांना
चांगलेच ज्ञात झालेले आहे. 
शिक्षकांकडे
आदर्श म्हणून पाहिले जात असतांनाच काही शिक्षकांनी मध्यंतरी अपंग असल्याची बोगस प्रमाणपत्र काढून मुख्यालयी अथवा रस्त्यावरी गावातच कशा बदल्या करून घेतल्या आहेत, याचीही माहिती माध्यमांमधून चांगलीच चर्चीली गेली. असो गव्हा सोबत किडेही रगडले जातात. त्याप्रमाचे सर्वच शिक्षक हे असेच आहेत, असे समजणे चुकीचे ठरेल. त्यामुळे ऐन महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जरी आक्रोश मोर्चा काढला असला तरी, केंद्र आणि राज्यातील सरकार हे महात्मा गांधीची जी तीन माकडे आहेत.
त्याप्रमाणेच यांची गत आहे.
त्यामुळे हा शिक्षकांचा आक्रोश ऐकून सरकार संवेदनशील निर्णय घेतील ही अपेक्षा करणे म्हणजे पाण्यात काट्या मारण्याप्रमाणेच म्हणावे लागेल...?
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
🔴जालना नायक🔴

No comments:

Post a Comment