Sunday, 15 January 2023

बँक खात्यातून ऑनलाईन पैसे गायब झाल्यास हा क्रमांक डायल करा...!

 बँक खात्यातून ऑनलाईन पैसे गायब झाल्यास हा क्रमांक डायल करा...!
सायबर गुन्हे दिवसागणित वाढत आहे.
 अशा साहेब वर गुण्या गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने यंत्रणा विकसित केली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे.
 ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील 
त्यांनी या १५५२६० क्रमांकावर कॉल करावा 
जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल 
तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास 
आणि रक्कम परत मिळवण्यास मदत होते
 इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने 
 विदेशात बसलेला हॅकर ही
तुमच्या खात्यावरील पैसे लंपास करू शकतो.
अर्थात त्याला तुम्हीही मदत करीत असता
 ते ओटीपी सांगून,एखादे ॲप डाऊनलोड करून हॅकर कितीही तरबेज असला तरी
 त्याला एकतर्फी हात साफ करता येत नाही.
यंत्रणा कशी काम करते
हेल्पलाइन नंबर वर कॉल येताच नाव मोबाईल क्रमांक,खाते क्रमांक पैसे वजा झाल्याची वेळ
 ही महत्त्वाची माहिती
 विचारली जाते, 
त्यानंतर सर्व माहिती
 http://cybercrime.gov.in
 या ग्रह मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्ड वर शेअर केली जाते 
या कामी आरबीआयचे ही सहकारी असते
 क्राईम झाल्यानंतर पहिले दोन-तीन तास महत्त्वाचे असतात
 आतापर्यंत अनेक जणांचे पैसे परत मिळाले आहेत
आठ मिनिटात रक्कम होल्ड---
सायबर गुन्हेगारांनी चुना लावल्याचे कळताच त्वरित 
१५५२६०
या क्रमांकावर कॉल केल्या सायबर यंत्रणा कामाला लागते 
आणि अवघ्या सात ते आठ मिनिटात ट्रान्सफर झाली
 रक्कम होल्ड केली जाते 
कारण गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी 
अनेक खात्यांचा वापर करीत असतो
 कॉल येताच संबंधित बँक अथवा ई साईटला अलर्ट केले जाते.
 त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच
 पैसे होल्ड केले जातात.----
माहिती-महाळुंगे इंगळे

No comments:

Post a Comment