बायकोला काय हवं?
कोणाला कधी कळलंय?
हिची लिपी,भाषा वेगळी..
आजवर मोजक्यांनाच जमलंय..
करणारच असाल विचार तर
द्या तिच्या भावनांना बळकटी
जाणा सूर तिच्याही संवेदनेचा
करा दूर तिची भांडी,खरकटी..
असते आकाश खास तिचेही
अस्तित्व तिला शोधू द्यावं..
मनगटात असते शक्ती तिच्या
कर्तुत्व तिलाही दाखवू द्यावं..
दोष कुंडलीतले दाखवून
सांगा कोण सुखी झाले?
जाणती बायकोला काय हवे ते?
संसार त्यांचे सुखी हो झाले....
चांदणं मनातलं
लेखिका सौ.प्रांजली मोहीकर
सोलापूर
No comments:
Post a Comment