Saturday, 28 January 2023

गळफास कसा घ्यायचा,कसा काढायचा हे पाहता पाहता गेला जीव आठवीच्या विद्यार्थ्याने घेतला ओढणीने गळफास-नागपूर

 गळफास कसा घ्यायचा,कसा काढायचा हे पाहता पाहता गेला जीव 
आठवीच्या विद्यार्थ्याने घेतला ओढणीने गळफास-नागपूर
मोबाईल ॲप पाहून तशीच कृती करण्याच्या प्रयत्नात 
आठवीत शिकत असलेल्या बारा वर्षीय विद्यार्थ्यांला जीव गमववा लागला.
 ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
आग्रण्य सचिन बारापात्रे असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सचिन सुरेश बारापात्रे हे परिसरात नानासाहेब राऊत यांच्या घरी किरायाने राहतात 
बुधवारी दुपारच्या सुमारास घराच्या बाजूला राहणारे किशोर पांडुरंग चिखले
 यांच्या टेरेसवर अग्रण्य खेळायला गेला होता.
 दरम्यान वडील काही कामानिमित्त बाहेर तर आई घर कामात व्यस्त होती
 काही वेळा अग्रन्य पतंग उडवली 
त्यानंतर तेथेच असलेल्या लाकडी शिडीवर तो आजूबाजूच्या नागरिकांना खेळताना दिसला
 त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टेरेसवर असलेल्या
 लाकडी शिडीला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत
 तो एका नागरिकाला दिसला.
ही माहिती त्यांनी घर मालक किशोर चिखले यांना दिली
 त्यांनी टेरेसवर पाहिले असता,
तो ओढणीच्या साह्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला
 याची माहिती घरी असलेल्या आईला दिली.
 त्यांनी आणि घर मालकांनी त्याला उपचार साठी मेडिकल येथे नेले असता.
डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले 
अग्रण्य ची आई गृहिणी असून त्यांचे वडील इलेक्ट्रिकचे काम करतात 
दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात अग्रण्य मोबाईलचे वेढ होते
 असे पुढे आले आहे 
त्यांनी आईच्या मोबाईल मध्ये अनेक ॲप डाऊनलोड केले होती.
 त्यापैकीच एका ॲप मध्ये 
गळ्यात धोर लटकवून तो कसा काढायचा 
याबाबतची माहिती तो सातत्याने बघत होता.
 त्यातूनच बुधवारी त्याने तसा प्रयत्न केल्याने त्यातून लागलेला गळफासात त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले
 आहे सक्करदारा पोलिसांनी आकस्मक मृत्यूची नोंद केली आहे
पालकांनो अशी घ्या काळजी--
⭕ मुले मोबाईलवर वारंवार काय पाहतात याकडे लक्ष द्या
⭕ अनावश्यक ॲप डाऊनलोड करीत असतील तर समजावून सांगा
⭕ मुले मोबाईल वरील कशाचे अनुकरण करतात याकडे लक्ष द्या
⭕मुलांच्या वर्तनामध्ये काय बदल होतो याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवा

No comments:

Post a Comment