Thursday, 12 January 2023

शब्द

  शब्द
  तसे तर शब्द जिवाभावाचे सखे सोबती
 श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे 
क्षणोक्षणी शब्दांच्या आधारानेच सोसत आले
 आजवर प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी
 अजूनही जेव्हा मन भरुन येते
 अनिवार करावे वाटते स्वतःला शब्दांपाशी मोकळे वाटते,
 त्यांनाच जावे सर्वस्वाने शरणतेच जाणून घेतील आतले 
उत्कट उमाळे तरीही शब्द हाताळताना असते सदैव 
साशंकत्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,
काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडाज्या अवचित करतात 
विद्ध, रक्तबंबाळ मी तर कधीचीच शब्दांची. 
ते कधी होतील माझे?
त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे
 अदृश्य ओझे?

No comments:

Post a Comment