Sunday, 1 January 2023

प्रश्न??? तुमचे -उत्तर आमचे खास शिक्षकांसाठीच...... आपल्या आवडत्या ब्लॉग

प्रश्न??? तुमचे -उत्तर आमचे खास शिक्षकांसाठीच......
चालू वर्ष म्हणजे 2023 पासून आपल्या
 rahul2407.blogspot.com 
या आपल्या आवडत्या ब्लॉग वर महाराष्ट्रातून जवळपास 
आतापर्यंत 07 लाखांहून अधिक शिक्षक
 व शिक्षणासंबंधी असलेले व्यक्ती यांनी भेटी दिल्या आहेत,
 तेही फक्त एका वर्षातच.....
 याची दखल घेत शिक्षकांनी सादर केलेल्या कथा,कविता व ज्वलंत प्रश्न आणि समस्या आपण 
आपल्या या ब्लॉगवर प्रसिद्ध करणार आहोत. 
या 2023 नवीन वर्षी पासून आपणास भेडसावत असणारे महत्त्वाचे प्रश्न कोणासमोर मांडावे?
त्यांची उत्तरे कशी शोधावी?? 
हा प्रश्न सर्व शिक्षक-शिक्षकेतर वर्गातील सहकाऱ्यांना पडतो.
 यासाठी आपणास इतरत्र जाण्याची गरज नाही
 आपण आपले प्रश्न 9822487073/8482824588 या 
व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत.
 ते प्रश्न आपण आमच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील
 शासनमान्य 
सर्व शिक्षक-शिक्षकेतर संघटना यांच्या समन्वयाने 
व शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची मदत घेऊन
 आपले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू.
 (आपल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या क्रमांकावर पाठवण्यात येईल.) 
यासाठी कोणत्याही प्रकारची फी नसेल
 व महत्त्वाच्या प्रश्नांना आपली परवानगी घेऊन
 ते प्रश्न-उत्तर नेहमी रोजच्या बातमी प्रमाणे रोज प्रसिद्ध केले जाईल, 
त्यासंबंधी आपल्या नावाची गोपनीयता पाळली जाईल
 या उपक्रमात कोणत्याही प्रकारचे बदल करावे असे वाटत असेल 
अथवा
 नवीन कल्पना असेल तर 
आपण आम्हाला लगेच कळवू शकता.
या महत्वाच्या बदलात आपले स्वागत. 
या प्रश्नावलीत आपण स्वतः किंवा संघटनेचे पदाधिकारी
 स्व:इच्छा सहभागी होऊ शकता.
 आपल्या सर्वांचे यामध्ये स्वागत आहे. 
जेणेकरून आपल्या सहकाऱ्यांच्या प्रश्नांची अधांतरी उत्तर न देता
 त्यांना अचूक उत्तर देता येतील
 या उपक्रमास सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर संघटना
 यांनी पाठिंबा दर्शविला 
असून इतर जिल्ह्यातील संघटना सुद्धा
 लवकरच समाविष्ट होतील.

No comments:

Post a Comment