पात्र मुलांची यादी आज होणार प्रसिद्ध
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी दि.७ जून रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती.
त्याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी शनिवारी दुपारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आरटीईची निवड यादी
या संकेत स्थळावर दुपारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवारपासून एसएमएस येण्यास सुरुवात होणार आहे. प्रवेश मिळाला तर एसएमएस प्राप्त
झालेल्या पालकांना दि.२३ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करून घेता प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त येणार आहे.
🟣👆RTE Lottery Result 2024-25 Maharashtra लिंक जाहीर Download
आरटीई’अंतर्गत राज्यातील आठ हजार ८२८ शाळांतील एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी सुमारे तीन लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये पुण्यातून १५ हजार ६५५ जागांसाठी सर्वाधिक ७७ हजार ५३१ जणांनी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल नागपूरमधून ३६ हजार ४९० जणांनी अर्ज भरले आहेत, तर मुंबईतील ६ हजार ५६९ जागांसाठी १८ हजार २०७ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
⭕वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा----
पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
No comments:
Post a Comment