बजेट 2024 Live Update : किती लाखापर्यंत उत्पन्नावर कर लागणार नाही?टॅक्स बाबत महत्त्वाच्या घोषणा
नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार वरुन 75 हजार करण्यात आलय.
🔴3 लाखापर्यंतच्या उत्पनावर कर लागणार नाही.
🔴3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पनावर 5 टक्के कर लागणार.
🔴7 ते 10 लाखापर्यंत उत्पन्नावर 10 टक्के कर लागेल.
🔴10 ते 12 लाखापर्यंत उत्पन्नावर 15 टक्के कर.
🔴12 ते 15 लाख उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स.
🔴15 लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर लागणार.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Union Budget 2024 Live Update :
हे होणार स्वस्त--------
सोने चांदी
इलेक्ट्रिक वाहनांबद्दल महत्त्वाची घोषणा
कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार.या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही.
🔴सोने-चांदी स्वस्त होणार. सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्क्यांनी घटवला.
🔴महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये बदल करणार.
🔴इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होणार.
🔴मोबाईल,चार्जर स्वस्त होणार.
🔴एक्स रे मशिन स्वस्त होणार.
🔴चामड्यापासून, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार.
🔴लिथियम बॅटरी स्वस्त होणार.
🔴सौर ऊर्जा पॅनल स्वस्त.
🔴माशांपासून बनवलेली उत्पादन स्वस्त होणार
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕हे होणार महाग-----
🔴प्लास्टिक महाग होणार
🔴टेलिकॉम उपकरणांवरील कस्टम 🔴ड्युटी 15 टक्क्यांनी वाढलं
स्टॉक मार्केटमधून इनकम होणाऱ्यांसाठी वेगळा टॅक्स भरावा लागणार त्यावरील कर वाढवण्यात आला आहे.
Union Budget 2024 Live Update : कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार
कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार. या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
कुठल्या क्षेत्रांना प्राधान्य असेल?
बजेटमध्ये रोजगार,
कौशल्य आणि MSME यावर फोकस असेल,असं निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. उत्पादकता, रोजगार, कौशल्य, उत्पादन, सेवा, एनर्जी, सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर, जमीन सुधारणा, शहरी विकास आणि सुधारणा या नऊ क्षेत्रांना प्राधान्य असेल असं सीतारमण म्हणाल्या.
भारतात महागाई दर किती टक्के?
“भारतात महागाई दर 4 टक्के आहे. लोकांनी सरकारवर विश्वास दाखवलाय. आमच्या धोरणांवर विश्वास दाखवला आहे. भारताची अर्थव्यवस्था चमकत आहे” असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.
🔴मुद्रा योजनेतून आता २० लाख कर्ज
देशातील युवकांना रोजगार-स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यास मुद्रा योजना राबवली जाते.
या योजनेतून युवकांना १० लाखापर्यंत कर्ज देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज सहज आणि अल्प व्याजदारात मिळते.
जर वेळेआधीच कर्जाची परतफेड केली तर कर्जावरील व्याजदरही माफ केले जाते.
ज्या लोकांनी त्यांचं जुनं कर्ज फेडलं असेल अशांना आता दुप्पट कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
No comments:
Post a Comment