Saturday, 20 July 2024

गुरू आणि शिष्य यांचं अनमोल नातं जपणारा हा भारतीय संस्कृतीत साजरा केला जाणारा अत्यंत शुभ दिवस. म्हणजेच"गुरुपौर्णिमा"

गुरुपौर्णिमा
गुरू आणि शिष्य यांचं अनमोल नातं जपणारा हा भारतीय संस्कृतीत साजरा केला जाणारा अत्यंत शुभ दिवस.मराठी महिन्यातील आषाढ पौर्णिमेलाच "गुरुपौर्णिमा" किंवा "व्यासपौर्णिमा" असेही म्हणतात.
आयुष्यात गुरू असणं खूप महत्त्वाचं असतं.
एक चांगलं, सुखद आयुष्य जगण्यासाठी,आयुष्यात येणाऱ्या अडचणी पार करून जीवनसागर पार करणं हे गुरुमुळे शक्य होते.
कारण गुरू फक्त पुस्तकी ज्ञान न देता आयुष्यातील अनुभवाचे देखील ज्ञान आपल्याला देतात.

गुरुपौर्णिमा: गुरु-शिष्य परंपरेचा महिमा
गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे, जो गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करतो. या दिवशी गुरूंचे पूजन केले जाते आणि त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरु म्हणजे आपल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवणारा, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारा, आणि आपल्याला शिष्यत्वाचा खरा अर्थ शिकवणारा. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंच्या महिमेला वंदन करण्याचा आणि त्यांच्या शिकवणीला स्मरण करण्याचा असतो.

◆गुरु-शिष्य परंपरेचा इतिहास:-
भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेचा इतिहास फार प्राचीन आहे. वेदकालीन काळात गुरुकुल पद्धती होती, ज्यात विद्यार्थी गुरुकडे राहून शिक्षण घेत. यामुळे शिक्षण फक्त शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता, जीवनाचे मूल्य, नैतिकता, आणि ध्येय यांच्या शिकवणीचा भाग असे. वेदव्यास, चाणक्य, आणि संत कबीर या सारख्या अनेक महान गुरुंनी आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन करून समाजाचे उत्थान केले आहे.

गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे महत्व
गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे महत्व केवळ गुरुंना वंदन करणे एवढेच नाही, तर त्यांच्या शिकवणुकीचे आचरण करणे हाही त्याचा एक भाग आहे. गुरु शिष्याच्या जीवनात एक प्रकाशस्तंभाप्रमाणे असतो, जो अज्ञानाच्या अंधारात मार्गदर्शन करतो. या दिवशी शिष्य गुरुंच्या चरणांवर पुष्प अर्पण करतात, त्यांना वंदन करतात, आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात.

गुरुविना कोण सांगेल जीवनाचे गूढ महान! 
त्यांच्या चरणी नतमस्तक होणे हेच आमचे पुण्यसंचयाचे दान!

ज्ञानाचा मार्ग गुरुने दिला, अज्ञानाचा अंधार हरवला,
गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना करुनी वंदन, 
शिष्यत्वाचा मान राखला।

गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंच्या शिकवणीचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा आहे. गुरु-शिष्य परंपरेचा हा उत्सव भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्या जीवनात गुरुंच्या महत्त्वाला अधोरेखित करतो. चला, आपण सर्वजण या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचे आभार मानू, आणि त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करू.
**लेखन**
रेश्मा माने मॅडम
सेवासदन प्राथमिक शाळा सोलापूर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌄प्रेरणदायी गोष्ट🌄
आई बाबा किती दृष्ट असतात ना….| Motivational Marathi Story
प्रत्येकाला असं वाटतं की आई बाबा आपल्याला काही ना काही तरी सांगतच असतात.
त्यांच्या भल्यासाठी सांगतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. आज आपण अशीच गोष्ट बघणार आहोत.
एका जंगलात एक चिमणी आणि चिमणा राहत होते. त्याचा संसार खूप छान असतो.
त्या दोघांना सुंदर पिल्ले होतात. आईबाबा म्हणून ते नेहमी सगळी काळजी घेत असतात.
 त्यांना वेळेवर चारा,पाणी सर्व काही देत असतात. हळू हळू ती पिल्ले मोठी होऊ लागतात.
रोज जंगलातून चिमणां चिमणी आपल्या पिल्लांसाठी अन्न शोधून घेऊन येत असतं.
कधी कधी तर ते स्वतः आशी राहयचे पण पिल्लांना पोटभर खालन घालायचे.
एक दिवस चिमणां अन्नाच्या शोधात खूपं लांब जातो पण त्याला काही मिळतं नाही.
हताश होऊन घरी येतो.भुकेने व्याकूळ झालेल्ल्या पिल्लांना पाहूण खूप रडतो.

चिमणां चिमणीची पिल्ली आता मोठी होऊ लागतात पण त्यांना आयते खाण्याची सवय लागते.
चिमणी विचार करते आता पिल्लांना स्वतःची सोय स्वतः करती आली पाहीजे. मग ती रोज आपल्या पिल्लांना घरट्यातून ढकलून देते. 
पिल्लू खाली पडणार म्हणून त्याला सावरते सुद्धा पण पिल्ली काही आपले पंख फडफडत नाहीत.
ती रोज पिल्लांना ढकलून दयायची पण पिल्लि काही आपले पंख फडफडत नसतं कारण त्यांना आयते खाण्याची सवय लागली होती. त्यांना असे वाटायचे की आईबाबां कीती दृष्ट आहेत. एक दिवस चिमणां चिमणी दोघेही आजारी पडतात.
आणि सगळे उपाशी राहतात कारण अन्न आणणार कोण? पिल्लांना तर उडताच येतं नव्हतं. मग तर चिमणां चिमणीचा निर्धार पक्का होतो.

काहीही झालं तरी पिल्लांना उडता आलं पाहिजेत. ते आपले प्रयत्न सोडत नाहीत. रोज प्रयत्न करतात आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. पिल्ली उडायला शिकतात. स्वतःचे अन्न स्वतः मिळवतात. तेंव्हा त्या पिल्लांना समजते की आपले आई बाबा आपल्याला आपल्या पंखात बळ
 येण्यासाठी रोज घरट्यातून ढकलून देत होते.
 आपले आई बाबा दृष्ट नाहीत तर ते आपल्याच भल्याचा – विचार करत असतात.
‘ म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की आई बाबा केंव्हाच दृष्ट नसतात ते नेहमी आपला चांगलाच विचार करत असतात..
पूजा भोसले
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

2) प्रेरणादयी गोष्ट
एक तरुण आयुष्यात संघर्ष करून थकला होता, त्याला पैसे कमवण्यासाठी कोणतेही काम सापडले नाही,त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला.
तिथे त्याला एक व्यक्ती भेटली.
त्या व्यक्तीने त्याला विचारले की तू इथे एकटा काय करतो आहेस? त्या तरूणाने अगोदर त्या व्यक्तीशी रागात वार्तालाप केला पण नंतर त्याने आपल्या सर्व समस्या त्या व्यक्तीला सांगितल्या.
मग तो व्यक्ती म्हणाला की तुला नक्कीच काही काम मिळेल, अशा प्रकारे निराश होऊ नकोस.
त्या तरुणाने सांगितले की मी पुर्णपणे खचलो आहे, माझ्याकडून आता काहीही होणार नाही. ती व्यक्ती त्याला म्हणाली की मी तुला एक गोष्ट सांगतो. तुझी निराशा त्यापासून नक्की दूर होईल.
एक लहान मुलगा होता एकेदिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली.
तो दररोज दोन्ही रोपांची काळजी घेत असे. एक वर्ष निघून गेलं.
निवडुंग मोठं झालं, पण बांबूचं रोप तसंच होतं. मुलाने हार मानली नाही आणि तो दोघांची काळजी घेत राहिला. त्याचप्रमाणे काही महिने निघून गेले,पण बांबूचं रोप तसंच तरीही मुलगा निराश न होता काळजी घेत राहीला. 
 

   काही महिन्यांनंतर बांबूचं रोप मोठं झालं आणि काही दिवसांत निवडुंगापेक्षाही बांबूचं रोप जास्त मोठं झालं. वास्तविक,बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करीत होते, म्हणून त्यास वाढण्यास थोडा वेळ लागला. त्या व्यक्तीने त्या तरुणास सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजेत.

आपली मुळे मजबूत होताच आपण आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू. तोपर्यंत एखाद्याने धीर धरला पाहिजे. त्याला त्या युवकाचा मुद्दा समजला आणि त्याने आत्महत्या करण्याची कल्पना सोडून दिली....
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

जे जे आपणास ठावे,ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी,सकळं जना,
तोची गुरु खरा,आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
आजच्या या मंगल दिनी आपले सर्व गुरुवर्य यांना आपण वंदन केलेच पाहिजे...
......................................
राहुल दत्तात्रय म्हमाणे
प्राथमिक विद्या मंदिर बार्शी 

No comments:

Post a Comment