करोना काळात राज्यातील
शालेय शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले होते.
मात्र,आता तीन वर्षांनी पुन्हा हे प्रशिक्षण पारंपरिक पद्धतीने ऑफलाइन होणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन, संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना सेवेची बारा वर्षे पूर्ण केल्यावर वरिष्ठ श्रेणी,तर वरिष्ठ श्रेणीत बारा वर्षे, म्हणजे एकूण २४ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांपैकी २० टक्के शिक्षकांना निकषांनुसार निवड
श्रेणी मिळते.
या श्रेणीनुसार त्यांना वेतनस्तर लागू होतो.
करोना काळात शैक्षणिक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने शिक्षकांचे प्रशिक्षणही ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली होती.
त्यानुसार तीन वर्षे प्रशिक्षणाची प्रक्रिया राबवली.
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ऑफलाइन प्रशिक्षणामुळे शिक्षक एकत्र येऊन त्यांच्यात सुसंवाद,शैक्षणिक देवाणघेवाण होते.
तसेच जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) सक्षमीकरण होण्यास मदत होईल..
राहुल रेखावार-संचालक
एससीईआरटी
...........................................................................
सदरील वरील पत्र हे फक्त वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑफलाईन प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे प्रशिक्षण नोंदणी शुल्क प्रमाणपत्र व इतर सहाय्य करिता ऑनलाइन पोर्टल विकसित करावयाचे आहे व त्या अनुषंगाने अधिकृत संगणक एजन्सी कडून खालील नमूद बाबींच्या समावेशीसह वरिष्ठ व वेतन श्रेणी प्रशिक्षणाच्या संदर्भात नवीन ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यासाठी हे दर पत्रक मागविण्यात आले आहे.
तरी हे पत्र फक्त नोंदणीसाठी आहे.तरी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे याची तारीख लवकरात लवकर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कळवली जाईल.
No comments:
Post a Comment