किती ते अर्थपूर्ण भाव....
त्या शब्दांची सुसंगत अर्थ आणि वाक्य उठा उठा चिऊताई
एखाद्या झोपलेल्या माणसाला दिवसाच्या सूर्योदयाची आठवण करून दिली की लाग आपल्या कामाला?
'सुरुवात कर आपल्या नव्या दिशेला' कर्तव्याची ती एक जाणीवच होती.
ते आपल्या मुलांप्रती-कुटुंबांप्रती.
आज आई-वडील मुलांसाठी अहोरात्र धडपड करतात,ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे मैलांचा प्रवास करत.
मुलं जसे
मुलांना मोठ्यापणी काठीचा आधार म्हणून पाहतो,पहावं की नाही हा सुद्धा विचार आपल्याला सतावत असतो.मग मुलांनी त्यांच्या विश्वात रमून जायचं नाही का?नक्कीच जायला हवं पण थोडंसं भान ठेवून.
प्रत्येक वेळी कालांतराने नवीन पिढीत बदल होत जात असतात,आणि चाललेली आहेत.
नवनवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध होत आहेत.
यांचा वापर करणे ही तितकंच गरजेचं आहे पण हे जरी खर असेल तरी सर्वांचा बुद्धीचा वापर कमी होत कमी झालेला आहे.
कमी वेळात जास्त पैसा व अंगाची मेहनत कमी यामुळे तरुण पिढीचा ओघ नको त्या गोष्टीकडे वाढत चाललेला आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू नये हे जरी खरे असले तरी त्या पाण्याचा प्रवाह किती आहे,याचा अंदाजही आपल्याला लावता यायला हवा.संधी माणसाला आयुष्यात नक्कीच मिळते फक्त वेळ महत्त्वाचा असतो संधीचं सोनं करणारी खूप माणसं आपण समाजात पाहतो पण त्यांचा आदर्श घेणारे कमीच...
पालकांनी आपल्या परिवारासोबत जसे बदल म्हणून बाहेर फिरायला-जेवायला जात असतो तसेच एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण पुढाकार घेऊन या गोष्टी करण्यास काहीच हरकत नाही...
नवीन गोष्टी शिकण्यास प्रत्येक वेळी पैसा च लागतो असं काही नाही प्रत्येक मुलांची इच्छा पूर्ण करण्यास पालक वर्ग समर्थ असतोच!पण त्यांची इच्छा कोणती? ती पूर्ण करायलाच हवी का? हे सुद्धा पाहायला हवी..
लहान वयात मोबाईल,गाडी यांची गरज मुलांना कशासाठी?
सरकारने गेम,वेबसाईट,वेब सिरीज यासारख्या गोष्टींवर बंदी घालावी इथपर्यंत आपण लाचार झालो आहोत का?
त्या शिक्षकांच्या हाती काठी द्या आणि मग पहा बदल कसा घडत जातो.पण कायद्यासमोर काय?
त्याविषयी न बोललेच बरं!हे पण तितकच खरे इतकेही वाईट दिवस अजून तरी आले नाहीत. मुलाला संस्कार नाहीत पण अशी वेळ येण्यास उशीर लागणार नाही.
ज्यावेळी प्रत्येक माणसाला समजेल की या पृथ्वीवर आपण कायमचे रहिवासी नाहीत आपण इथल्या ग्रहावरील तात्पुरती माणसं आहेत. तो ही इथला आनंद उपभोगण्यासाठी मग पैसा-अडका सोने चांदी हे सगळे इथलच.
आपण जसे आलोत आपण तसेच जाणार
या गोष्टी सर्वांनी जाणली पाहिजे या सर्व गोष्टीत सर्वात एकच गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे "जाणीव" वरच्या कवितेतल्या त्या चिऊताईला जी झाली...
बाळाचे नाव घेताच जागी झाली चिऊताई
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
लेकरा फक्त तू बाळासारखं रहा म्हणजे झालं
कोणाला दुखावण्यासाठी लिहिलं नाही वाटलं म्हणून पाठवलं...
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
राहुल शकुंतला दत्तात्रय म्हमाणे
No comments:
Post a Comment