चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीचे अपहरण, बारा तासांच्या आत पोलिसांनी घेतला शोध; अकोल्यातील धक्कादायक घटना
पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण
अकोला : रामदास पेठ पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या टिळक पार्क परिसरातील महादेव मंदिराजवळ खेळत असताना एका पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. गुड्डी रवी मलाकर असे तिचे नाव असून, ती चंद्रपूर जिल्ह्यातील महाकाली कॉलनी, प्रकाश नगर चंद्रपूर येथील रहिवासी
आहे.
या प्रकरणी रवी मलाकर यांनी रामदास पेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा न्यायालयासमोरच्या मोकळ्या जागेत उभारलेल्या झोपड्यांमध्ये बाहेरगावातील काही कुटुंब मुक्कामी आहेत.
टिळक पार्क परिसरातील महादेव मंदिराजवळ रवी मलाकर यांची पाच वर्षांची गुड्डी नामक चिमुकली खेळत होती.
यादरम्यान,एका अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेले.
ही बाब कुटुंबीयांच्या ध्यानात येताच त्यांनी मुलीची शोधाशोध केली. परंतु, तिचा कोठेही पत्ता लागत
नसल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी रामदास पेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.
या मुलीचा रंग सावळा असून,केसाचे दोन चोटी बांधलेली आहे.
तसेच काळा शर्ट, लाल मिडी परिधान केलेली आहे.
ही मुलगी कोणालाही आढळून आल्यास रामदास पेठ पोलिसांसोबत संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांनी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣बारा तासाच्या आत पोलिसांनी घेतला शोध----
रामदास पेठ पोलिस
स्टेशनच्या हद्दीतून अपहरण झालेल्या पाचवर्षीय चिमुकलीचा छडा लावण्यात रामदासपेठ पोलिस तसेच स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
अवघ्या बारा तासांत अपहृत चिमुकली मुलगी तिच्या आईच्या कुशीत विसावली.
अकोटफैलस्थित बापूनगरमधील एका महिलेच्या घरातून मुलीला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी अपहरण करणाऱ्या महिलेला
पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्हा
न्यायालयासमोरच्या मोकळ्या जागेत उभारलेल्या झोपडीत मुक्कामी असलेल्या रवी मलाकार (रा. चंद्रपूर) यांच्या पाच वर्षांच्या गुड्डी नामक चिमुकलीला आरोपी महिलेने पळवून नेल्याची घटना ५ जानेवारी रोजी दुपारी घडली होती.
या प्रकरणी रवी मलाकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, महिला पोलिस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. या प्रकरणी सलमा परवीन अकबरशाह ऊर्फ अंजली रामदास तायडे (४०, रा. शंकर नगर, अकोटफैल) या महिलेला अटक करण्यात आली आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣'एसपीं'नी निर्देश देताच यंत्रणा लागली कामाला-----
दिवसाढवळ्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची बाब जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गांभीर्याने घेत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शंकर शेळके,रामदासपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांना दिशानिर्देश दिले.
अखेर ६ जानेवारी रोजी मानेक टॉकीज परिसरातून संशयित महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिने चिमुकल्या मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣लाल रंगाच्या साडीवरून लावला छडा---
पोलिसांना लाल रंगाची साडी घातलेल्या महिलेने अपहृत चिमुकलीला चॉकलेट दिल्याचा सुगावा लागला.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेयांची तपासणी केली असता,लाल रंगाची साडी घातलेली महिला आढळून आली.
डोळ्यांमध्ये सुरमा,एका पायात काळा धागा व गळ्यात कवडीच्या माळा घातलेली महिला धार्मिक स्थळांच्या परिसरात भीक मागणारी असल्याचे निष्पन्न झाले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣म्हणे, नातेवाइकाची मुलगी आहे!--
आरोपी महिलेने चिमुकलीला शंकर नगरमधील घरात डांबून ठेवले. त्यापूर्वी शेजाऱ्यांनी विचारले असता, ही नातेवाइकाची मुलगी असल्याचे सांगितले.
लोकमत
No comments:
Post a Comment