जिल्ह्यातील खासगी संस्थांची स्थिती; २६ जानेवारीपर्यंत समायोजनाचे नियोजन
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सोलापूर,इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला कल,पटसंख्या वाढीची शाळांमधील स्पर्धा, या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेसह अनुदानित खासगी प्राथमिक शाळा आणि अल्पसंख्याक शाळांमधील पटसंख्या कमी झाली.
त्यामुळे सद्यः स्थितीत सोलापूर जिल्ह्यातील १०८ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यात अल्पसंख्याक शाळांवरील ४६ तर बिगर अल्पसंख्याक शाळांमधील ६२ शिक्षक आहेत. या सर्वांचे २६ जानेवारीपूर्वी समायोजन होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे २६ जानेवारीपूर्वी समायोजन केले जाणार आहे. २०२२-२३च्या संचमान्यतेनुसार मंजूर
कार्यरत पर्दाची प्रवर्गनिहाय माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली आहे.
त्याआधारे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. त्यासाठी १७ व १८ जानेवारी या दोन दिवसात जिल्हा परिषद
शिक्षकांच्या हरकती नोंदविल्या जाणार आहेत.
त्यानंतर हरकतॉवर सुनावणी होईल व काही नावात बदल असल्यास तो करून घेतला जाणार आहे,त्यानंतर खासगी शाळांमधील रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अतिरिक्तमध्ये सेवानिवृत्तीच्या
समायोजनाचे असणार तीन टप्पे
🟣जिल्ह्यातील अन्य खासगी शाळांमधील रिक्तपदे पाहुन त्याठिकाणी पहिली संधी
•🟣खासगी शाळांमध्ये समायोजन करून राहिलेल्याचे महापालिका,
नगरपालिकांच्या शाळेत समायोजन
•🟣खासगी शाळा व महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये रिक्तपदे नसल्यास झेडपी शाळांमध्ये मिळणार संधी
उंबरठ्यावरील शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे.
तत्पूर्वी,जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची यादी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना
हरकतीसाठी पुन्हा एकदा पाठविली आहे.
त्या मराठी माध्यमांचे ८८, कन्नड माध्यमांचे ९ आणि उर्दू माध्यमांचे ४ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.
इतरही माध्यमांचे सात शिक्षक
१३५ शाळांना वेतन रोखण्याचा इशारा
• शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती मागवूनही जिल्ह्यातील तब्बल १३५ खासगी प्राथमिक शाळांनी त्यांच्याकडील कार्यरत व रिक्त,अतिरिक्त
शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेली नाही.
या शाळांनी उद्यापर्यंत (बुधवार) माहिती सादर न केल्यास त्या शाळांची वेतनबिले स्वीकारली जाणार नाहीत. त्या शाळांचे वेतन रोखण्यात येईल,असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला
दरम्यान,शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित खासगी शाळांना अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेणे बंधनकारक आहे, खासगी शाळा,महापालिका,नगरपालिका
व. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये समायोजन न झालेल्या शिक्षकांना पुणे विभागातील इतर कोणत्याही जिल्ह्यातील शाळांवर नेमणूक दिली जाणार आहे.
सकाळ
No comments:
Post a Comment