जिल्हा परिषदेतील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागात जिल्ह्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनेक प्रकारच्या फाईल जमा करत असतात.
या फाईल जमा करत असताना आवक शाखेतील कर्मचाऱ्याने त्या फाईलवर आवक नंबर टाकून पोहोच देणे आवश्यक आहे. आवक नंबरसह पोहोच देणे बंधनकारक आहे.
मात्र तसे होताना दिसून येत नसल्याची तक्रार शिक्षक भारती संघटनेने निवेदनाव्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सीईओंना दिले निवेदन-
शिक्षक भारतीने केलेली ही मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्य केल्यास व शिक्षण विभागास आवक नंबर देण्याविषयी सूचना केल्यास जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ८० टक्के मानसिक व आर्थिक त्रास कमी होऊ शकतो. प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता येऊ शकते.
हे निवेदन जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. या निवेदनावर विजयकुमार गुंड, देवदत्त मेटकरी व शरद पवार यांची स्वाक्षरी आहे.
शिक्षण विभागाकडून आवक नंबर टाकून पोहोच दिली जात नाही.
कर्मचाऱ्यांना कामासाठी अनेक वेळा
हेलपाटे घालावे लागतात, असाही आरोप शिक्षक भारती संघटनेने केले आहे.
लोकमत
No comments:
Post a Comment