आगामी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्लास्टिक ध्वजाच्या बंदीची अंमलबजावणी कडक करण्यासाठी शिक्षण संस्थांवरही निशाणा साधला आहे.
शाळेच्या आवारात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे आढळल्यास संबंधित शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्याचे आदेशच सरकारने काढले आहेत शैक्षणिक संस्थाचालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार २६ जानेवारी, १५ ऑगस्ट किंवा इतर राष्ट्रीय उत्सवांदरम्यान प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
या बंदीचे पालन न केल्यास संबंधितांवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे शाळा व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय उत्सवांदरम्यान प्लास्टिक ध्वज वापरल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
राष्ट्रीय उत्सवांच्या काळात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.
कार्यक्रम संपल्यावर शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी त्यांच्याकडील राष्ट्रध्वज टाकून देतात. त्यामुळे ध्वजाचा अवमान तर होतोच, शिवाय पर्यावरणाचीही हानी होते. त्यामुळे प्लास्टिक ध्वज वापरण्यास सरकारने मनाई केली आहे.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागासह शालेय शिक्षण विभागानेही सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह राज्यातील शाळा-महाविद्यालयांना या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
राष्ट्रध्वज रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी फेकू नयेत.
असे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार सन्मानपूर्वक नष्ट करावेत.
राष्ट्रध्वज वापरण्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना शाळा;तसेच महाविद्यालयांच्या आवारात कायमस्वरूपी फलकांद्वारे प्रदर्शित कराव्यात,असेही या आदेशात म्हटले आहे.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
⭕शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी-
शाळा,महाविद्यालय तसेच शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रध्वजाचा आवश्यक तो मान राखणे आणि प्लास्टिक राष्ट्रध्वजाची बंदी पाळणे आवश्यक आहे.
प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांच्यावर त्याची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांनी शैक्षणिक संस्थांना सर्व नियम निदर्शनास आणून द्यावेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
⭕शिक्षण संस्थांसाठी सूचना-
विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रसंगी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याची खबरदारी संस्थांनी घ्यावी.
त्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करावे.
आवश्यकतेनुसार वैयक्तिक वापरासाठी छोट्या कागदी ध्वजांचा वापर करावा कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करताना त्याचा योग्य मान राखला जाईल याची काळजी घ्यावी कागदी राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देवू नयेत.
असे आढळल्यास किंवा राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार सन्मानपूर्वक नष्ट करावेत.
राष्ट्रध्वजाच्या वापराबाबतचे सर्व अधिनियम, आदेश, सूचनांची काटेकोरपणे अंमलबाजवणी करावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना विद्यालयांच्या आवारात कायमस्वरुपी फलकांच्या सहाय्याने प्रदर्शित कराव्यात.
विद्यालयांच्या आवारात राष्ट्रध्वज वापराबाबतच्या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
⭕याद्वारे होईल कारवाई-
(अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय
अपराध आहे.
नागरिकांनी ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment