अतुल जयस्वाल, अकोला : आपली पृथ्वी सूर्याभोवती काहीशी लंबवर्तुळाकार मार्गांनी फिरत असताना पृथ्वी व सूर्य यांच्यामधील अंतर कमी-अधिक होत असते.
नववर्षाच्या प्रारंभी बुधवार, ३ जानेवारी रोजी या दोघांमधील अंतर सर्वांत कमी असणार आहे.
एरव्ही पृथ्वी व सूर्य यामधील सरासरी अंतर हे १४ कोटी ९६ लाख किलोमीटर एवढे असते.बुधवार, ३ जानेवारीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी पृथ्वी व सूर्यातील अंतर केवळ १४ कोटी ७० लाख ९८ हजार ८८० किमी एवढेच राहील.
याचा अर्थ पृथ्वी, सूर्य यांच्यामधील बुधवारचे अंतर हे सरासरी अंतरापेक्षा सुमारे २६ लाख किलोमीटरने कमी असेल.
परिणामी, या दिवशी सूर्यबिंबाचा आकार नेहमीपेक्षा मोठा राहील. कमी अंतराच्या अशा स्थितीला उपसूर्य स्थिती म्हणूनसुद्धा ओळखतात.
याविरुद्ध असलेल्या अपसूर्य स्थितीत पृथ्वी व सूर्य यामधील अंतर हे १५ कोटी २६ लाख किलोमीटर एवढे असते. पुढे सहा महिन्यांनंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे अंतर सर्वाधिक असेल.
सध्या सूर्य दक्षिण गोलार्धाकडे झुकलेला असल्याने त्या भागात उन्हाळा, तर आपल्या उत्तर गोलार्धात सध्या हिवाळा हा ऋतू सुरू आहे.
🟣उपसूर्य व अपसूर्य स्थिती-
पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती म्हणजे उपसूर्य स्थिती होय,तर पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील स्थिती म्हणजे अपसूर्य स्थिती होय.
उपसूर्य स्थितीत सूर्य व पृथ्वी जवळ येत असल्याने सूर्यबिंब काही प्रमाणात आकाराने मोठे दिसते,तर अपसूर्य स्थितीत दोघांमधील अंतर महत्तम असते,त्यामुळे सूर्याचा आकार काही प्रमाणात कमी दिसतो.
पृथ्वी आणि सूर्याच्या अंतराचा खेळ सदैव सुरू असतो. याला उपसूर्य व अपसूर्य स्थिती म्हणतात.
३ जानेवारी रोजी उपसूर्य स्थिती येत आहे. आकाशप्रेमींनी या अनोख्या आकाश घटनेची नोंद वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी लक्षात घ्यायला हवी. -प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला
🟣सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे-
सूर्याला आकाशगंगेच्या मध्याभोवती एक चक्कर मारण्यास २२५ दशलक्ष वर्षे लागतात.
सूर्य हा आकाशगंगे च्या मध्याभोवती २५० किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे. आजपर्यंत सूर्याचे २० चक्कर पूर्ण झाले.
सूर्याचे वय निश्चित पने करणारे पहिले वैज्ञानिक sir Arthur Eddington आहेत.
सूर्याचे एकूण आयुष्य १० अब्ज वर्षे आहेत, त्यापैकी पाच अब्ज वर्षे संपले आहेत.
म्हणजेच अजून पाच अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू हा श्वेत व बटू ताऱ्यात होईल.
🟣पृथ्वी आणि सूर्या मधील अंतर किती आहे?
अलीकडील माहितीनुसार सूर्य आणि पृथ्वीचे अंतर 149,597,870,700 मीटर (92,955,807 मैल) आहे. या अंतराला 1AU (वन खगोलशास्त्र एकक) देखील म्हणतात
आणि हे अंतर एखाद्या ग्रहाला संदर्भ बिंदू म्हणून घेऊन मोजले जाते, येथे शुक्र ग्रहाचा संदर्भ घेतला आहे,या पद्धतीमध्ये जास्त खोलवर न जाता त्रिकोणमिती वापरून अंतर मोजले जाऊ शकते.
हे अंतर मोजण्यासाठी इतर पद्धती देखील आहेत. जसे की, पॅरॅलेक्स पद्धत, ग्रॅव्हिएटॉन पद्धत परंतु ही पद्धत पहिल्या दोन वैज्ञानिकांनी वापरली.
जीन रिशर
जियोव्हानी डोमेनेको
सन 1672 मध्ये.
आता एक मनोरंजक भाग येतो.
या शास्त्रज्ञांच्या फार पूर्वी हनुमान चालिसामध्ये पृथ्वी आणि सूर्यामधील अधिक अचूक अंतर लिहिले गेले आहे.
“जुग सहस्त्र योजन पर भानु!, लील्यो ताहिमधुर फल जानू!”
याचा अर्थ सूर्य (भानु) जुग सहस्त्र योजनेच्या अंतरावर आहे (जुग सहस्त्र योजन- हिंदी मधील अंतर एकक)
हिंदू वैदिक साहित्यानुसार खालील रूपांतरण पद्धती वापरल्या जात आहेत.
1 जुग = 12000 सहस्त्र
1 सहस्त्र = 1000 योग
1 योग = 8 मैल
अशा प्रकारे
12000 X 1000 X 8 = 96,000,000 मैल
1 मैल = 1.6 किमी
हे पुढे असे सूचित करते की हे अंतर 96,000,000 * 1.6 किलोमीटर = 153,600,000 किमी आहे.
यावरून खगोलशास्त्र क्षेत्रात आपण किती प्रगत होतो याचा आपण अंदाज घेऊ शकता.
माझ्याकडे बरीच तथ्ये आहेत जी सिद्ध करतात की आपण गणित, भौतिकशास्त्र, मेट्रोलॉजी, जीवशास्त्र, ज्योतिष, अर्थशास्त्र आणि बर्याच क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट आहोत.
No comments:
Post a Comment