Saturday, 8 October 2022
कोजागिरी पौर्णिमा दमा व अस्तमा लोकांसाठी कितपत फायदेशीर---. 🌕कोजागिरी पौर्णिमा महत्त्व-पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती.कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात.श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात.कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते. 🌕खगोलशास्त्रदृष्ट्या महत्त्व-या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात.तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते.ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. 🌕सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व-या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात. 🌕आरोग्यशास्त्रदृष्ट्या महत्त्व-दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते.चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते. 🌕कोजागिरी पौर्णिमेची विविध नावे कोणती-कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नाव आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात आपण कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा माडी पौर्णिमा असे म्हणतो. त्याच प्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला लोख्खी पुजो, कौमुदी पौर्णिमा, शरद पुनम व आश्विन पौर्णिमा अशी अनेक नावे आहेत. 🌕कोजागिरी पौर्णिमा संबंधित पौराणिक कथा-आपला प्रत्येक हिंदू सणांमध्ये पौराणिक कथा असते.तसेच कोजागिरी पौर्णिमा या सणाला सुद्धा पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. ही गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे.मगध नावाचे राज्य होते. या राज्यामध्ये एक गरीब आणि सुसंस्कृत असा वलित नावाचा ब्राह्मण राहत होता. परंतु त्याची पत्नी ही त्या ब्राह्मणाप्रमाणे नव्हती ती दृष्ट होती.ब्राह्मण गरीब असल्यामुळे त्याची पत्नी त्याला त्रास द्यायची त्याच्याकडून अनेक कामे करून घ्यायची.त्या ब्रह्मणाला त्याच्या पत्नीचा खूप त्रास होत होता.कारण की त्याची पत्नी त्याला चोरी करायला लावायची.तसेच अनेक वाईट कामे त्या गरीब ब्राह्मणाकडून त्याची पत्नी करून घ्यायची. तसेच एक दिवस हा गरीब ब्राह्मण पूजा करत असताना त्याच्या पूजेमध्ये त्याच्या पत्नीने व्यत्यय घातला होता.आणि त्याची पूजा पाण्यामध्ये फेकून दिलेली होती.आता तू त्याच्या पत्नीला खूप जास्त प्रमाणात कंटाळा आला होता. तिच्या त्रासामुळे तो आता जंगलात निघून गेलेला होता.त्याला जंगलामध्ये काही नागकन्या भेटल्या त्याने त्या नागकन्येला त्याची अवस्था समजावून सांगितली.नागकन्यांनी त्या गरीब ब्राह्मणाला कोजागिरी व्रत करण्याचा सल्ला दिला होता.त्याने कोजागिरी व्रत केले आणि तेव्हापासून त्याला सुख-समृद्धी लाभली.तसेच त्याची पत्नी ही आता त्याला त्रास देत नव्हती चांगली झालेली होती.आणि त्यांचा संसार सुखाने नांदत होता.अशाप्रकारे कोजागिरी व्रत करण्याची ही पौराणिक कथा कोजागिरी पौर्णिमा निमित्त प्रसिद्ध आहे.शरदाचे चांदणे,आणि कोजागिरीची रात्र..चंद्राच्या मंद प्रकाशात,जागरण करू एकत्र..दूध साखरेचा गोडवा,नात्यांमध्ये येऊ दे..आनंदाची उधळण,आपल्या जीवनी होऊ दे…आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!RDM_SMS
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment