मनाला चटका लावून टाकणारी
आज एक गोष्ट घडली खरंच मृत्यू इतकं कसं स्वस्त असू शकतं
सुवर्णा व मृणाल ताईनी हा शेवटचा टोकाचा निर्णय का घेतला?
दिनांक २६ ऑक्टोबर २०२२-
अमरावती गाडे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या बंद घरात मायलेकीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली सुवर्णा प्रदीप वानखेडे व मृणाल प्रदीप वानखडे अशी मृत मायलेकीची नावे आहेत
ही घटना रात्री दहाच्या सुमारास समोर आली.प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
उच्चशिक्षित कुटुंबातील मायलेकीच्या आत्मघात प्रकरणे प्रदीप वानखडे याच्या विरुद्ध कौटुंबिक छळ व आत्महत्या प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करून बुधवारी त्याला अटक करण्यात आली
दिवाळीच्या रात्री दोघींनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे त्याला अटक केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
थँक्यू वर्ल्ड फॉर युवर लव अँड काइंडनेस
असे लिहून त्याखाली माझ्या बाबाला आम्ही नको आहे 'आता बस झाला त्रास'अशा दोन ओळीत लिहित सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या २४ वर्षे तरुणीने पंख्याला ओढणीने बांधत त्याचा फास आवळला
त्याच वेळी सहाय्यक शिक्षक असलेल्या तिच्या आईने देखील साडीचा पदर गळ्यात अडकवला स्टूलवरुन खाली उडी घेतली क्षणात दोघेही प्राण पाखरू उडाले.
दिवाळीच्या दिवशी अख्खा देश प्रकाशात नाहून निघाला असताना त्या मायलेकीने लक्ष्मीपूजनाच्या आधीच आत्मघाताचा टोकाचा निर्णय घेतला.
शिक्षक संमती कॉलनी येथील उच्चभ्रु अशा वानखडे कुटुंबातील सुवर्णा व मृणाल रात्रीच्या सुमारास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले पोलिसांनी घटनास्थळाहुन मृणाल ने लिहिलेले सुसाईड नोट जप्त केले
त्या सुसाईड नोट व सुवर्ण यांचे बंधू यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुवर्णाचे पती तथा मृणालचे वडील प्रदीप याला अटक केली
टोकाच्या कौटुंबिक वादाची अखेर मृत्यूने झाली पूजा मांडण्यापूर्वी अंतिम प्रवासाकडे कुच-दिवाळीच्या दिवशी आत्महत्या पूर्वी माय लेकीने देवासमोर लक्ष्मीपूजनाची तयारी केली होती
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा हे स्पष्ट झाले पूजेसाठी चौरंग ठेवला होता.
दुसऱ्या चौरंगाला आंब्याची पाने लावली तर बाजूलाच हार करण्यासाठी फुले व सुई दोरा आढळून आला
फटाके व दिवाळी पूजनाचे अन्य साहित्य देखील आणण्यात आले
किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी देखील करण्यात आली
मात्र त्यापूर्वी मायलेकीने गळफास लावला सूत्रानुसार वानखेडे हे दिवाळीच्या दिवशी दुपारनंतर घराबाहेर पडले दिवाळीच्या दिवशी असे काय घडले नेमके की दोघांनीही आत्मघाताचा निर्णय घेऊन तो तडकाफडकी अमलात
आणला
No comments:
Post a Comment