Wednesday, 26 October 2022

यशकल्याणी करमाळा समाजरत्न पुरस्कार २०२२ मा.श्री.अनिल भगवान बनसोडे प्रशासन अधिकारी न.पा.शिक्षण मंडळ बार्शी व करमाळा यांना जाहीर

यशकल्याणी करमाळा समाजरत्न पुरस्कार २०२२ मा.श्री.अनिल भगवान बनसोडे प्रशासन अधिकारी न.पा.शिक्षण मंडळ बार्शी व करमाळा यांना जाहीर
वसंतराव दिवेकर आणि लोकशिक्षिका लीलाताई दिवेकर यांनी स्थापन केलेल्या
शिक्षण संस्थेकडून दरवर्षी यश कल्याणी करमाळा समाजरत्न पुरस्कार देण्यात येतो. 
शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या थोर व्यक्तींना यश कल्याणी करमाळा समाज रत्न पुरस्काराने दरवर्षी गौरवण्यात येते. 
यंदाच्या वर्षी २९ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रशासन अधिकारी म्हणून
यंदा श्री.अनिल भगवान बनसोडे न.पा.शिक्षण मंडळ बार्शी व करमाळा यांना गौरवण्यात आले. न.पा.शाळेच्या सर्व भौतिक सुविधांकडे लक्ष देऊन शाळा स्मार्ट करण्याकरता व न.पा.शाळेला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी केलेले उल्लेखनीय कार्याबद्दल यांना सन्मानित करण्यात आले.
स्वच्छ शिक्षण प्रशासन अधिकारी कशाप्रकारे काम करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून आपण यांच्या कार्याकडे पाहतो.
म्हणून या सर्व कार्याची दखल घेत यश कल्याणी परिवाराकडून यंदाचा हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रशासनातील शैक्षणिक अधिकारी म्हणून मा.श्री. अनिलजी बनसोडे साहेब यांचा गौरव करण्यात आला.
 त्यांच्या या अतुलनीय कामगिरी बद्दल हार्दिक अभिनंदन
व भावी वाटचालीला सर्व शिक्षक परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!!!!

No comments:

Post a Comment