Monday, 31 October 2022

बार्शीच्या शिरपेचात आणखी एक तुरा ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

वृक्ष संवर्धन उपक्रमाची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद बार्शीच्या शिरपेचात आणखी एक तुरा:-
मागील चार वर्षापासून पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या वृक्ष संवर्धन समितीच्या उपक्रमाची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून याबाबतचे प्रमाणपत्र बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते स्वीकारले आहे.
बार्शी शहराच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे अवचित्य साधून ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने हर घर तिरंगा हर घर एक पेड असा उपक्रम राबविण्यात आला.
 यामध्ये वृक्ष संवर्धन समितीने शहर व तालुक्यातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना आपल्या नातेवाईकांना पत्र लिहून एक झाड लावण्याचे आव्हान करण्यात आले होते या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला विक्रमी दहा हजार ७५ पत्र बार्शीतील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी लिहिले आपल्या प्रिय व्यक्तीला एक झाड लावण्याची विनंती पत्राद्वारे केली अशा प्रकारे एकाच दिवसात एका विषयावर पत्र लिहिण्याचा एक विक्रम झाला
याची नोंद ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाले याबाबतचे प्रमाणपत्र आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते समितीच्या सर्व सदस्यांना स्वीकारले समितीतील सर्व सदस्य मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे म्हणाले की मागील चार वर्षांपूर्वी वृक्ष लागवड व संवर्धन चळवळ वाढावी या हेतूने समितीने अनेक उपक्रम घेतले आहेत.गच्चीवरील बाग,परसबाग स्पर्धा,निबंध लेखन स्पर्धा संक्रांती निमित्त वाण म्हणून देण्यासाठी मोफत फळांची रोपे वाटप हर घर तिरंगा हर घर एक पेड या उपक्रमामुळे झालेली चळवळ नक्कीच राज्यभर पोहोचवणार आहे या उपक्रमात सर्व शाळांनी सहभाग घेतला व भारतीय डाक विभागाने उपक्रमात मोठे सहकार्य केले या विक्रमामुळे बार्शी चे नाव देश पातळीवर झळकेल असा विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a Comment