Monday, 24 October 2022

आज दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण दहा वर्षे योग पुन्हा नाही

   आज दिसणार खंडग्रास सूर्यग्रहणआणि दिवाळीत खंडग्रास सूर्यग्रहणाचा अनोखा योग आज मंगळवार अनुभवता येणार आहे या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असल्याचे खगोल प्रेमींसाठी ही पर्वणी असणार आहे पुढील सूर्यग्रहण पाच वर्षांनी म्हणजे २ ऑक्टोंबर २०२७ मध्ये दिसणार आहे हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्चिम मध्य भाग संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागात दिसणार आहे मुंबईतून पहिल्याच सायंकाळी ४ वाजून ४९ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल ग्रहण मध्य संध्याकाळी ५ वाजून ४३ वाजता संपेल यावेळेस चंद्रबिंब सूर्य बिंबाचा ३६% टक्के भाग झाकून टाकणार आहे सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे सूर्यग्रहण थेट पाहू नये
🌞 सूर्यग्रहण कसे लागते- चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्राची गोलाकार गडद सावली पृथ्वीवर पडते यालाच आपण सूर्याला ग्रहण लागले असे म्हणतो चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ही सावली वेगाने जमिनीवर प्रवास करते पृथ्वीच्या ज्या भागावरून ही सावली प्रवास करते त्या भागांमध्ये खग्रास किंवा खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळते
🌞राज्यात येथे दिसेल या वेळेस ग्रहण-
पुणे-४.५१/६.३१
नाशिक-४.४७/६.३१
नागपूर-४.४९/६.२९
कोल्हापूर-४.५७/६.३०
औरंगाबाद-४.४९/६.३०
सोलापूर-४.५६/६.३०
ग्रहणाचा मानवावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही तसा कोणताही पुरावा नाही असे नासाने म्हटले आहे

No comments:

Post a Comment