अखेर समायोजनाची तारीख ठरली...
सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत..
सोलापूर जिल्हातील सन २०२२-२३ मधील ५९ शिक्षकांची समायोजन प्रक्रिया पार पडणार आहे.
रुजू करुन न घेतलेल्या सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या,अशंता अनुदानित,अल्पसंख्यांक शिक्षकांचे समायोजन दिनांक ११/१०/२०२४ रोजी दु. १२.०० वा शिक्षणाधिकारी माध्य,जिल्हा परिषद,सोलापूर यांचे दालनात होणार आहे.
ही प्रक्रिया खूप दिवस लांबलेली होती ही प्रक्रिया लवकर होणार की नाही यात शंका होती.कारण आचारसंहिता कधी लागू होईल यामुळे शिक्षक वर्गात चर्चा होती.
आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया होत असल्यामुळे सर्व शिक्षकांना लवकरच नवीन शाळेत रुजू होतं येईल.
अतिरिक्त झालेली शिक्षक नवीन शाळेत रुजू होण्यास गेल्यानंतर त्या शिक्षकांना त्या ठिकाणी रुजू करून घेतलेले नव्हते त्यानंतर त्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा ऑफिसमध्ये येऊन सर्व शिक्षकांना पाठपूरावा करावे लागत असे.
शिक्षणाधिकारी श्री.सचिन जगताप (माध्य) जिल्हा परिषद,सोलापूर यांच्या प्रयत्नाने अतिरिक्त शिक्षकांना त्यांना आता हककाची शाळा मिळणार आहे.
शाळा मिळाल्यानंतर शिक्षकांना दोन दिवसानंतर नवीन शाळेत रुजू होता येणार आहे.कारण दसरा व रविवारची सुट्टी यामुळे सोमवारी शिक्षकांना नवीन शाळेत रुजू होता येईल.
नवीन शाळेतील मुख्याध्यापक,संस्था चालक त्यांना लवकरात लवकर रुजू करून घेतील अशी आशा आहे.कारण काही दिवसापूर्वी झालेले समायोजन यामध्ये शिक्षकांना काही शाळांनी घेण्यास नकार दिला होता.त्याची परत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे व सर्व शिक्षकांना आपल्या हक्काची शाळा मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕या शिक्षकांचे होणार आहे समायोजन---
No comments:
Post a Comment