शिक्षकाला मारहाण,शिवीगाळ; शाळा बंद ठेवत केले शिक्षकांनी आंदोलन...
असभ्य वर्तन करणाऱ्या पालका विरुद्ध सोलापूर मधील नावाजलेली शाळा *सेंट जोसेफ* मधील सर्व शिक्षकांनी दिनांक एक ऑक्टोंबर रोजी काम बंद आंदोलन केले. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व शिक्षक हाताला काळ्याफिती बांधून आंदोलनात सहभागी झाले. पालकांच्या असभ्य वर्तनामुळे सोलापूर पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी निवेदन ही देण्यात आले.
26 सप्टेंबर रोजी शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला शिस्तीच्या कारणावरून रागावल्याचा राग मनात धरून पालकांनी शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण करणे,शिवीगाळ करणे व शाळेत गोंधळ घालणे अशा प्रकारचे कृत्य त्या पालकाकडून घडले.
यामुळे सर्व शिक्षक काम बंद आंदोलनात सहभागी झाले.
याविषयी माहिती सांगताना तेथील प्रमुखांनी सांगितले की 26 ऑक्टोबरला एका पालकांनी विद्यार्थ्याला रागावल्याचा राग मनात धरून शाळेत गोंधळ घातला.
शिस्तीच्या कारणातून शिक्षकाने विद्यार्थ्याला चापट मारली यामुळे तो पालक शिक्षकांच्या अंगावर धावून गेला. पालकांमुळे वाईट बातमी जाऊ नये व समाजात शाळेविषयी प्रतिमा मलिन होऊ नये, म्हणून या आंदोलनात सर्व संस्था चालकांसह शिक्षकांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्याला शिस्त लावणे ही शाळेची जबाबदारी आहे, पण पालकांना या सर्व विषयी इतका द्वेष का निर्माण झाला? याचा विचार आज सर्वांनीच केलं पाहिजे. याविषयी पालकांना भेटीसाठी बोलवले असता ते पालक अद्यापही शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या भेटीस आले नाहीत.
जेवणाच्या सुट्टीत त्या पालकांनी गोंधळ घातल्यामुळे सर्वच विद्यार्थी गोंधळाला घाबरलेले होते. सर्व शिक्षकांनी त्या पालकांना शांत राहण्यास सांगितले काही वेळाने त्यांच्या दुसऱ्या नातेवाईकांनी येऊन परत त्या शिक्षकांना मी पाहून घेईन अशा प्रकारे दम देत गोंधळ घातला.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕ अखेर पालकांनी तक्रार घेतली मागे----
शिस्तीच्या कारणावरून शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारहाण केलेली घटना याविषयी पालकांनी पोलीसात तक्रार दिली होती.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕ प्रत्येक पाल्यांच्या पालकांना वाटते की आपला मुलांनी खूप शिकावं, मोठा अधिकारी व्हावं म्हणून मुलांची सर्व लाड पूर्ण करत असतात.
एखादी गोष्ट मुलाला करता आली नाही की त्याचं खापर मात्र शिक्षकांवरच फोडला जातो.
विद्यार्थी मुळात शाळेत फक्त पाच ते सहा तास असतात. पण पालकांच्या अपेक्षा मात्र खूप असतात.
त्यांच्या मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी शिक्षकांची असते आणि हे सर्व कार्य शिक्षक तंतोतंत पाळतच असतात कारण ते आपल्या पुढचं भविष्य आहेत. जर मुलांना एखादी छडी मारली तर त्यात गैर काय?? मुलांसाठी अहोरात्र धडपडणारे शिक्षकांना असं जर पालकांचा रोष पहावयास मिळत असेल,तर विद्यार्थ्यांवर संस्कार करायचे तरी कसे??
पण काही गोष्टी याला अपवाद असतात जर पालकांनी शाळा शिक्षक संस्था यांच्यावर संपूर्ण विश्वास दाखविला, तर आणि तरंच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे. पालकांना शाळेविषयी,शिक्षकांविषयी कोणत्याही प्रकारची शंका असेल तर ते स्वतः शाळेत जाऊन त्यांच्याविषयी त्यांच्यासोबत चर्चा करावी...
कोणतीही शाळा असो कधीही कोणत्याही वाईट गोष्टी साठी पाठिंबा देत नाही त्यांचं ध्येय एकच असतं की शाळेतील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे आणि खूप मोठा झाला पाहिजे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
राहुल शकुंतला दत्तात्रय म्हमाणे
प्राथमिक विद्या मंदिर बार्शी
No comments:
Post a Comment