महाराष्ट्र विधानसभा 2024 कालावधी 26 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेचा कार्यकाल संपत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
निवडणूक आयोगाने राज्यांमध्ये आचारसंहिता लागू केलेली आहे.
निवडणूक आयोगाने मतदानाचा दिनांक व निकालाच्या दिनांक ची पत्रकार परिषदेत घोषणा केलेली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला 2024 मतदान होईल तर 23 नोव्हेंबरला 2024 निवडणुकांचे निकाल लागतील.
@ 23 ते 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.
@ 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज ची छाननी होईल.
4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल.
⭕राज्यामध्ये आचारसंहिता लागू------
प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते, तर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर.
निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आचारसंहिता लागू होते.
⭕आचारसंहिता म्हणजे काय?
देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत.
याच नियमांना आचारसंहिता म्हणतात.
निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे.
⭕आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम----
सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. शीलान्यास,उद्घाटन,लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.
सरकारी गाडी,सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे.
कुठल्याही पक्षाला प्रचारसभा,रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.
कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.
जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे.
कुणाच्याही घरावर,जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवरदेखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर,पत्रकं असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानही घेणं आवश्यक आहे.
विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नाही.
मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात.
प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते.
मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते.
मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत. प्रचारसाहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये.
मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार 'भ्रष्ट आचरण' आणि अपराध/गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांनी करता कामा नये.
शासनाच्या कामगिरीचे होर्डिंग्ज लावता येणार नाही
संबंधित मतदारसंघात कोणताही शासकीय दौरा होणार नाही.
सरकारी वाहनांमध्ये सायरन लावले जाणार नाहीत.
शासनाचे यश दर्शविणारे होर्डिंग काढले जातील.सरकारी इमारतींमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास बंदी असेल.
सरकारच्या उपलब्धी असलेल्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि इतर माध्यमांमध्ये जाहिरात करता येणार नाही.
कोणत्याही प्रकारची लाच किंवा प्रलोभन टाळा. देऊ नका, घेऊ नका. सोशल मीडियावर पोस्ट करताना विशेष काळजी घ्या.
तुरुंगात जायला तुमची एक पोस्ट पुरेशी आहे. त्यामुळे कोणताही संदेश शेअर करण्यापूर्वी किंवा लिहिण्यापूर्वी आचारसंहितेचे नियम काळजीपूर्वक वाचा.
⭕सामान्य माणसालाही नियम लागू सामान्य माणसानेही या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आचारसंहितेनुसार कडक कारवाई केली जाईल.
याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कोणत्याही नेत्याच्या प्रचारात गुंतला असलात,तरी तुम्हाला या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. जर एखाद्या राजकारण्याने तुम्हाला या नियमांच्या बाहेर काम करण्यास सांगितले, तर तुम्ही त्याला आचारसंहितेबद्दल सांगून तसे करण्यास नकार देऊ शकता. कारण असे करताना आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला ताब्यात घेतले जाऊ शकते.
⭕उगाच असे मेसेज 'फॉरवर्ड' करु नका----
आचारसंहिता लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी पोस्टर लावणे किंवा जाहीर सभा-बैठका अशा विविध मार्गांनी प्रचार करत असताना आचारसंहितेच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
तसेच निर्बंध समाजमाध्यमांतील संदेशांनाही लागू आहेत.
या काळात राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये अफवा पसरविणे, ‘फेक न्यूज’ प्रसारित करण्यावर बंदी आहे. तसेच एखादा पक्ष किंवा उमेदवाराचा प्रचार करणे, हा गुन्हा नसला, तरी अशा संदेशांचा खर्च संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चात धरण्यात येणार आहे. जातीय किंवा धार्मिक तेढ उत्पन्न करणारा वा वाढविणारा संदेश पाठविला, किंवा ‘फॉरवर्ड’ केला, तरी संबंधित वापरकर्ते आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या‘अॅडमिन’लाही जबाबदार धरण्यात येईल. त्याशिवाय मतदारांना प्रलोभन दाखविणे, हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल.
तसेच, विविध मतदार कलचाचण्या किंवा मतदानोत्तर चाचण्यांचे निकालही मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होइपर्यंत प्रसिद्ध करता येणार नाहीत. निवडणूक काळात ‘पेड न्यूज’ फोफावतात. त्यामुळे एखादा संदेश ‘पेड न्यूज’च्या वर्गवारीत येणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल
No comments:
Post a Comment