Friday, 4 October 2024

जागर नारी शक्तीचा उत्सव सोलापुरी नवरात्रीचा;खूने मावशींची प्रेरणादायक कथा

स्वप्न ते इंजिनियर चा प्रवास अखेर तनुजा B.tech engineer झालीच..
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
अनेक स्त्रिया अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत जिद्दीने आपल्या क्षेत्रात उच्च पदी पोहोचतात.
किंवा योगदान देत असतात. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रिया म्हणजे या आदिशक्तीचीच विविध रूपे. 
त्यामधील आज श्रीमती पुष्पा मल्लिनाथ खुने यांचा परिचय आज आपण यामधून करून घेणार आहोत.त्यांच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट आज पाहणार आहोत.

एकदा स्वप्न मनात आणलं की नारीशक्ती काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे-- खूने मावशी. 
मावशीचे शिक्षण फक्त आठवी पास त्यांच्या आयुष्यात अशी एक धडकी भरवणारी गोष्ट घडली.
लग्नानंतरच्या काही वर्षातच त्यांचे पतीदेवांचे निधन झाले.
त्यावेळेस मुलं खूप लहान होती.

तनुजा ही फक्त चार वर्षाची तर मुलगा सिद्धार्थ हा दीड वर्षांचा होता.
घरात वयोवृद्ध सासू-सासरे ते पण आजारी. खांद्यावर जणू दगड-धोंडे भरून पोते ठेवल्यागत...

वेळ रडत बसण्याची नव्हती,कारण माऊलीचं ध्येय खूप मोठं होतं.
लेकरांना परिस्थितीमुळे शिक्षणात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये.
मिळेल ते काम करू पण शिक्षणात काही कमतरता नको.
ती मुलं पण आईसारखी जिद्दीच की..

त्या माऊलीने सोलापुरात शिक्षणासाठी येणाऱ्या महाविद्यालयीन मुलांना घरगुती जेवण मिळावे म्हणून मेसची सोय केली,आईच्या हातचं जेवण.ती मुलं नको कशी म्हणणार??

मेसने तर घराला मोठी पाठबळ देण्याचे काम केलं.
अंगात कला व काम करण्याची जिद्द यामुळे २००६ साली श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळा येथे मावशी बाई म्हणून त्या रुजू झाल्या.

शाळेचे काम संपल्यानंतर घरच्या घरी घरगुती कडक भाकरी,शेंगापोळी पापड,पराठे बनवणे,शेंगा चटणी, खाकरा यांच्यासोबत दिवाळीचे फराळ,सणाला लागणारे साहित्य कार्यक्रमानुसार जेवणाचे ऑर्डर बनवून देणे.

यासारख्या कामाची सुरुवात त्यांनी केली.मुलं सुद्धा जसा वेळ मिळेल तसे आईच्या कामात मदत करत होती. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या प्रदर्शनात स्टॉल उभारणी करून पदार्थ विकणे अशा प्रकारे व्यवसाय सुरू केला.

आज अखेर त्या माऊलीचे ते स्वप्न सत्यात उतरलं आज मुलगी तनुजा ही B.tech इंजिनियर म्हणून बेंगलोर या ठिकाणी
खाजगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.
तर मुलगा सिद्धार्थ B.com चे शिक्षण घेत आहे.
दोन्ही मुलांना सुशिक्षित व संस्कार देण्यात ती माऊली कधीच कमी पडली नाही हे मात्र तितकच खरं....
 त्यांची जिद्द पाहून सामाजिक संस्थे मार्फत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

 आजही रोजच्या जीवनात वेळ काढत संस्कार संजीवनी व पाखर संकुल अनाथ आश्रमात ते यथाशक्ती सेवा बजावतात.
या कार्यात त्यांची मुलंही मागे नाहीत...
त्यांचा हा प्रवास खरंच आपल्या समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे.
 कष्ट करण्याची व मनात जिद्द असली की आपण कोणत्याही प्रकारचे ध्येय सहज गाठू शकतो हेच त्या माऊलीने आज दाखवून दिलं... वंदन या माऊलीला आणि तिच्या जिद्दीला!!!

नारी हीच शक्ती आहे नराची,
नारी हीच शोभा आहे घराची,
तिला द्या.आदर,प्रेम,माया,
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजच्या या जागर नारीशक्तीचा उत्सव सोलापुरी नवरात्रीचा
तर्फे आपल्या सर्वांच्या वतीने त्या माऊलीला आई तुळजाभवानी खूप शक्ती देवो हीच सदिच्छा......
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
राहुल शकुंतला दत्तात्रय म्हमाणे
प्राथमिक विद्यामंदिर बार्शी

No comments:

Post a Comment