Wednesday, 23 October 2024

निवडणुकीचे काम नाकारल्यास नोकरीवर गंडांतर;शनिवार-रविवारी प्रशिक्षण

निवडणुकीचे काम नाकारल्यास नोकरीवर गंडांतर
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सोलापूर,विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील १९ हजार
शासकीय कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी आली आहे.
त्या सर्वांना त्यासंबंधीची पत्रे पाठविली आहेत.
या कर्मचाऱ्यांचे शनिवारी,रविवारी पहिले प्रशिक्षण पार पडणार आहे. निवडणूक कामास नकार दिला किंवा कामावेळी कोणी गैरहजर राहिल्यास त्या कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०मधील कलम ३२ व १३४ नुसार थेट फौजदारी गुन्हा दाखल होतो.
त्या कर्मचाऱ्याची चौकशी लागते आणि त्यामुळे ना पगारवाढ ना पदोन्नती मिळते.
वेळप्रसंगी त्या कर्मचाऱ्याला कायमचे घरी देखील बसायला लागू शकते.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी ०३ हजार ७२० मतदान केंद्रे असून एका केंद्रावर किमान १५०० मतदान होईल,असे नियोजन आहे.
एका मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येकी चार कर्मचारी असणार आहेत निवडणुकीस्राठी शिक्षण, महसूल, ग्रामविकास, कृषी अशा बहुतेक शासकीय विभागांमधील कर्मचान्यांना इलेक्शन ड्यूटी देण्यात आली आहे.

शनिवारी (ता. २६) व रविवारी या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला प्रशिक्षण पार पडणार आहे.
त्यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावेच लागणार आहे. 'बीएलओं'ना देखील या काळात इलेक्शनडयूटी करणे बंधनकारक आहे. मतदानापूर्वी आणखी एका प्रशिक्षण आहे. शहानिशा केल्याशिवाय कोणाचीही ड्यूटी रह होणार नाही हे निश्चित आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
८८ विधानसभा निवडणुकीसाठी जिल्‌ह्यातील १९ हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटीची पत्रे पाठविण्यात आली आहेत.
त्या प्रत्येक कर्मचान्यांना निवडणूक कामकाज बंधनकारक आहे.
येत्या शनिवारी व रविवारी त्यांचे तालुकानिहाय पहिले प्रशिक्षण होणार आहे.
गणेश निन्हाळी,उपजिल्हा निवडणूक अधिकारी,सोलापूर

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
प्रत्येक मतदान केंद्रास इंडिलेबल शाईच्या दोन बॉटल-----
• मौसूर येथे इंडिलेबल शाई तयार करण्याचा शासकीय कारखाना आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी तेथूनच शाई मागविण्यात आली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रासाठी दोन शाईच्या बाटल्या लागतात.
उजव्या हाताच्या बोटाच्या नखाला लावलेली शाई किमान दोन महिने तरी पुसली जात नाही...
सकाळ वृत्तसेवा सोलापूर

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

No comments:

Post a Comment