Thursday, 26 September 2024

PAT-2 अंतर्गत संकलित चाचणी-1आयोजन बाबत

PAT-2 अंतर्गत संकलित चाचणी-1 आयोजन बाबत
नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT अंतर्गत संकलित चाचणी-1
⭕या चाचणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
⭕चाचणीचे उद्देश--
पायाभूत चाचणी उद्देश/ उपयोग / फायदे :- 1) विद्यार्थ्याची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे. २) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल. ३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.

⭕चाचणी संबंधित सूचना----
1.सर्व मूल्यमापन चाचणी दिलेल्या तारीख व वेळेत व्हावे.

2.सर्व पेपर शाळेत विद्यार्थी निहाय पुरवण्यात येतील.

3.तालुकास्तरावर प्रश्नपत्रिका सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जावी.

4.सर्व प्रश्नपत्रिका मुख्याध्यापक यांच्या ताब्यात देणे व एकही पेपर बाहेर जाणार नाही याची काळजी घेणे.

5.शाळा स्तरावर त्याच दिवशी वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा होतील.

6.प्रश्नपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढून समाज माध्यमांवर पाठवणे गैर आहे.असे होणार नाही याची गोपनीयता पाळावी अन्यथा शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल.

7.एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर तो जेव्हा येईल त्याचवेळी परीक्षा घेण्यात यावी.

8.उत्तर सूची प्रमाणेच उत्तरपत्रिका तपासण्यात यावेत.
9.यासाठी शिक्षकांना उत्तर सूची मिळतील.

व्ही एस के (VSK) मार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची नोंद करणे..

राहुल रेखावार 
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

No comments:

Post a Comment