सोलापूर शहरातील खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी नेहरू वसतिगृह येथे दुपारी 12.00 वाजता सुरू झाली.
ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
या प्रक्रियेसाठी काही संघटनांनी विरोध दर्शविला होता,पण प्राथमिक शिक्षण अधिकारी मा.श्री.कादर शेख साहेबांनी शंकेचे निरसन करत 2022-23 ची समायोजन प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
या प्रक्रियेवर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी समायोजन बाबत कार्यालयात खालील प्रमाणे पत्र दिले होते.
त्यामध्ये या प्रकारावर मुद्दे नमूद करण्यात आली होते .
विषय :- सन २०२२-२३ चे खाजगी प्राथमिक अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत..
संदर्भ :- ०३.०७.२०२४ रोजी संघटनेने आपल्या कार्यालयास दिलेले पत्र
१) सन. २०२१-२२ च्या समायोजनातील अतिरिक्त शिक्षकांना हजर करुन न घेतलेल्या शाळेतील रिक्त पदे प्रथम कमी करावीत.
२) सर्व शाळांचे १००% सेवकसंच दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर समायोजन प्रक्रिया सुरु करावी.
३) सन २०२२-२३ च्या सेवक संचानुसार खाजगी अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे.
४) सन २०२२-२३ च्या सेवक संचानुसार शाळांमधील रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे.
५) शैक्षणिक वर्षानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना समायोजनात प्रथम प्राधान्य दयावे.
६) समायोजन करताना जात संवर्गनिहाय समायोजन करावे.
७) समायोजनातून उरलेल्या शिक्षकांना ४ ऑक्टोंबर २०१७ च्या शासन आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कायम स्वरुपी समायोजित करावे.
वरील मुद्दे विचारात घेऊन समायोजन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी ही नम्र विनंती.
आपला विश्वासु,
(भारत गुणापुरे)
अध्यक्ष
या प्रक्रिया दरम्यान काही शिक्षकांनी प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडल्याचे सांगितले.
तर प्रक्रिया दरम्यान शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मा.श्री.कादर शेख साहेब यांनी सांगितले की 2022-23 खाजगी प्राथमिक शाळेमधील शिक्षक अतिरिक्त झाले होते.
त्यामधील बिगर अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षक यांचे आज दि.28 रोजी नेहरू वसतिगृह येथे समायोजन प्रक्रिया आयोजित केली.
यामध्ये रिक्त पदांची खात्री करून संवर्ग व पद याविषयी सर्वांना सूचना करून शासन निर्णय बाबी सांगून सर्वांचे आक्षेप लक्षात घेऊनच त्यांचे निरसन करण्यात आले.
समायोजन प्रक्रिया यशस्वीरित्या राबवण्यात आली. यावेळी रिक्त पदे किती आहेत कोणती आहेत.
हे सांगण्यात आले,प्रत्येक शिक्षकाला शाळा निवडताना ठराविक वेळही देण्यात आला होता.
यामुळे शिक्षकांना योग्य ती शाळा निवडण्यात अडचण आली नाही या प्रक्रिया दरम्यान एकूण 36 शिक्षकांना समायोजन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते व ती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली.प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापक,संस्थाचालक यांना समायोजित शिक्षकांना लवकरात लवकर हजर करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जर रुजू करण्यास विलंब केला तर याची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
एखाद्या शिक्षकाला हजर करून घेण्यास उशीर झाला तर मधल्या काळाचे वेतन हे प्रशासन न देता ते वेतन मुख्याध्यापक यांच्याकडून वसूल केले जाईल असे सांगण्यात आले.
ही समायोजन प्रक्रिया यशस्वीरित्या पार तर पडली पण त्या शिक्षकांना मुख्याध्यापक संस्थाचालक लवकरात लवकर रुजू करून घेतील का?
हे आता पहावे लागणार आहे.
...................................................
2022-23 समायोजन प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शकपणे शासन निर्णया नुसार योग्य प्रकारे पार पडली.
सुनील चव्हाण
प्रदेश महासचिव
डॉ. देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
No comments:
Post a Comment