Tuesday, 9 April 2024

मतदानाला जाताना निवडणूक ओळखपत्र विसरले तर 'नो टेन्शन' निवडणूक आयोग १२ पुरावे ग्राह्य धरणार

मतदानाला जाताना निवडणूक ओळखपत्र विसरले तर 'नो टेन्शन' निवडणूक आयोग १२ पुरावे ग्राह्य धरणार
🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙
मतदानाला जाताना कधी
निवडणूक ओळख पत्र विसरून राहते तर कधी रस्त्यात हरवल्याने अनेकांचा हिरमोड होतो.
अशावेळी काहीजण मतदान करण्याचे टाळतात.
आता यातून निवडणूक आयोगाने मार्ग काढला आहे.
मतदारांचे मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारांचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.
✉️✉️✉️✉️✉️✉️✉️✉️✉️✉️✉️
🪭खालील प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार--------
⚫मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्राशिवाय 
⚫पासपोर्ट
⚫वाहनचालक परवाना (लायसन्स), केंद्र,राज्य शासन,सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र,
⚫बँक,टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक
⚫पॅन कार्ड
⚫रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले स्मार्ट कार्ड.
⚫तसेच मनरेगांतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड
भारत सरकारच्या
सर्व मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड
⚫छायाचित्र असलेले निवृत्तिवेतनाची कागदपत्रे
⚫खासदार आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र
⚫आधार कार्ड
⚫भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र
 हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत,असे निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
मतदान कसे करावे -

आपले नाव मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. 

मतदान अधिकारी चिन्हांकित यादी आणि ओळखपत्रसंबंधित कागदपत्रे यांची जुळवणी करेल.

तुमची ओळख पटल्यानंतर दुसरा मतदान अधिकारी पक्‍की शाई तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीला लावेल.

मतदार चिठ्ठीवरील क्रमांकाच्या आधारे मतदान अधिकारी मतदान करण्यास मान्यता देईल.
आपल्या निवडीच्या उमेदवाराच्या नावापुढील निळे बटन दाबा. छोटे बटण लाल चमकेल किंवा बीपचा लांब आवाज होईल.
जे की आपले मतदान सफल झाल्याची खात्री करेल.
व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या उमेदवारास मत नोंदविल्याबाबत खात्री करून घ्या.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
मतदान केंद्र आणि मतदार यादीत नाव शोधण्यासाठी:-
प्ले स्टोअरवर जाऊन Voter Helpline हे ॲप डाउनलोड करा.

किंवा पुढील संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत नाव शोधता येईल.
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा २०२४: शहरनिहाय यादी:-
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕फेज:-१) एप्रिल १९ रामटेक, नागपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर

⭕टप्पा:-०२) २६ एप्रिल बुलढाणा, अकोला,अमरावती,वर्धा,यवतमाळ, वाशीम,हिंगोली,नांदेड,परभणी

⭕टप्पा ०३) ७ मे रायगड,बारामती, उस्मानाबाद,लातूर,सोलापूर,माढा, सांगली,सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग, कोल्हापूर हातकणंगले

⭕टप्पा ४) १३ मे रायगड,बारामती, उस्मानाबाद,लातूर,सोलापूर,माढा, सांगली,सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग, कोल्हापूर हातकणंगले

⭕टप्पा ०५) २० मे धुळे,दिंडोरी, नाशिक,पालघर,भिवंडी,कल्याण, ठाणे,मुंबई उत्तर,मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य,मुंबई,उत्तर – मध्य,मुंबई दक्षिण – मध्य,मुंबई दक्षिण
आपल 
लोकमत

No comments:

Post a Comment