Friday, 26 April 2024

'मिशन डिस्टिंक्शन' का चुकले?

अकोला लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत 'मिशन डिस्टिंक्शन' हाती घेत विविध उपक्रम राबवून ७५ टक्के मतदानाचे लक्ष्य ठेवले होते.
त्यानुषंगाने मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती करण्यात आली;मात्र अकोला मतदारसंघात सुमारे ५८ टक्के मतदान झाल्यामुळे मिशन डिस्टिंक्शन का चुकले याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.
मतदार यादीत आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे,याचा शोध न लागल्यास, तसेच मतदार यादीत मतदाराचे नाव न दिसल्यास मतदान होत नाही.

त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो.
त्यानुषंगाने मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना
मतदान केंद्राबाबतची माहिती आधीच देण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाते.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बीएलओ) ही जबाबदारी देण्यात आली होती.
परंतु,मतदारसंघात अनेक मतदारांपर्यंत याबाबतची माहिती मिळाली नाही,तसेच मतदार चिठ्ठ्यादेखील अनेक मतदारांपर्यंत पोहोचल्या नसल्याची तक्रार आता पुढे आली आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
लोकमत अकोला

No comments:

Post a Comment