Friday, 26 April 2024

मतदानादिवशी मिळणार पगारी सुटी अपवादात्मक परिस्थितीत दोन तासांची सवलत-सोलापूर

जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे.
एकही कामगार मतदानापासून वंचित राहू नये,यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व कामगार,अधिकारी,कर्मचारी यांना पगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अपवादात्मक परिस्थितीत ज्या औद्योगिक संस्था,कंपनी बंद ठेवल्याने त्यांचे नुकसान होत असेल,तेथील कामगारांना मतदान करण्यासाठी दोन ते तीन तासांसाठी सुट्टी देणे संबंधितांना बंधनकारक असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त सु. म. गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाचे उद्योग,ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय ५ एप्रिल २०२४ अन्वये
निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टारन्ट, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, कारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापना यांच्या व्यवस्थापक मालकांना सुट्टी देणे बंधनकारक आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना
पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर,मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल,याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांना घेणे आवश्यक राहील.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सुटी,सवलत नाकारल्यास करा तक्रार----
■ जिल्ह्यातील कामगारांकरिता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय स्तरावर दक्षता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
कामगारांना मतदानाकरिता सुट्टी अथवा दोन तासांची सवलत आस्थापना मालक देत नसल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२१७-२७२८४०१ तसेच भ्रमणध्वनी क्र. ९८२२४९४८६५ वर संपर्क साधून तक्रार देण्यात यावी,असे आवाहनही सहायक कामगार आयुक्त श्री. गायकवाड यांनी केले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सकाळ वृत्तसेवा⭕

No comments:

Post a Comment