निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवणार
जिल्हाधिकारी यांचा इशारा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर
मतदार यादीतील घोळ दिसून आला.
कुठे मतदारांची नावेच गायब होती,तर कुठे मतदारांच्या नावापुढे डिलीट लिहिलेले होते.
परिणामी मोठ्या संख्येने मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
मतदार यादीतील हा घोळ प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे.
यासंदर्भातील रितसर तक्रार आल्यास चौकशी करून दोषी बूथ लेवल अधिकारी (बीएलओ) वर प्रशासकीय कारवाई केली जाईल,अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात शुक्रवारी
इटनकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकारांनी त्यांना मतदार यादीतील घोळाबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी उपरोक्त
माहिती दिली. काही बीएलओ सोडले, तर मोठ्या प्रमाणावर बीएलओंनी प्रामाणिकपणे काम केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
इटनकर म्हणाले, मतदानाचे प्रमाण कमी झाले असले, तरी मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एकूण २४ हजार ८३७ इतके मतदार वाढले आहेत. मतदार यादी ही प्रत्येक वर्षी अपडेट होत असते.
यावर्षी आम्ही ८० हजारांवर मृत मतदारांची नावे कमी केली.
मतदार
यादीबाबत काही तक्रारी होत्या.
काही राजकीय पक्षांकडूनही तक्रारी आल्या. त्या तक्रारीचे लगेच निराकरण करण्यात आले. ज्या काही तांत्रिक अडचणीमुळे मतदारांचे प्रश्न निर्माण झाले,त्या बाबींची कार्यालयीन शहानिशा करून त्यांच नाव मतदार यादीत घेतले जाईल असे इटनकर यांनी स्पष्ट केले यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
७ दिवसांत तक्रारी निकाली काढणार---
१९ एप्रिल रोजी ज्या मतदारांना मतदान करता आले नाही, तसेच ज्या मतदारांची नावे यादीत नाही.
ज्यांना आपले नाव संबंधित मतदान केंद्रावरच हवे आहे किंवा ज्यांना आपल्या मतदार कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची आहे, त्यांनी ६, ७, व ८ क्रमांकाचे अर्ज भरून घ्यावे,अशा लोकांची कामे ७ दिवसांत होतील. सध्या निवडणूक विभागाचे पोर्टल बंद आहे.
४ जूननंतर ते सुरू होईल. त्यामुळे ४ जूननंतरच ही कामे केली जातील,असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत
No comments:
Post a Comment